7 pictures that take you inside Rekha's sari collection
सत्तरी पार करुनही रेखा 'या' साड्यांमुळे दिसते तिशीतली; पाहा तिच्या ७ सुंदर साड्या, ‘असं’ हवं कलेक्शन By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2024 5:29 PM1 / 10बॉलीवूडची (Bollywood) सदाबहार दिवा अर्थात अभिनेत्री रेखाने (Rekha) नुकतंच सत्तरी गाठली (Saree Collection). ती अजूनही तितकीच चार्मिंग आणि सुंदर दिसते. तिशीतल्या महिलांना लाजवेल असं तिचं सौंदर्य आहे(7 pictures that take you inside Rekha's sari collection).2 / 10सिलसिला, इजाजत, उमराव जान आणि इतर बऱ्याच चित्रपटांमध्ये तिने कमालीची भूमिका साकारली आहे. ४० वर्षांच्या बॉलीवूड कारकिर्दीत तिने सातासमुद्रापार नाव गाजवलं आहे. रेखा केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे देखील चर्चेत असते.3 / 10प्रत्येक मुलींना आणि खासकरून महिलांना तिच्या साड्यांचे कलेक्शन आवडते. कांजीवरमपासून ते गोल्ड जरी आणि पैठणी. रेखाकडे असणाऱ्या साड्या तुम्हालाही हव्या असतील, तर 'या' ७ प्रकारच्या साड्या तुम्ही देखील नक्की ट्राय करून पाहू शकता. आता सणावाराचे दिवस सुरु आहेत. यंदाच्या दिवाळीला नक्की यापैकी एक साडी खरेदी करू शकता.4 / 10 रेखा अधिकतर सोनेरी रंगाच्या साडीवर दिसते. गोल्डन बॉर्डर असलेली ही क्रीम रंगाची साडी, आपण कोणत्याही प्रसंगी कॅरी करू शकता. या साडीमुळे आपल्याला रिच लूक मिळेल. रेखाने या लूकमध्ये सिंपल मेकअप आणि लाल रंगाची लिपस्टिक लावली आहे. शिवाय हेवी इअररिंग्समुळे रेखाचा लूक आकर्षक दिसत आहे. 5 / 10काळ्या रंगाची साडी त्यावर गोल्डन बॉर्डर खूप आकर्षक दिसत आहे. आपण ही साडी लग्न, पार्टी किंवा सणासुदीलाही घालू शकता. हेवी ज्वेलरी, मांग टीका सोबत सोनेरी बांगड्यांमुळे रेखाचा सुंदर लूक खुलला आहे. आपण ही असा लूक दसऱ्यानिमित्त ट्राय करू शकता. 6 / 10गुलाबी साडीमध्ये रेखा क्युट आणि सुंदर दिसत आहे. गुलाबी रंगाच्या साडीमध्ये रेखाने हेवी मेकअप केला नाही. शिवाय एक नेकलेस आणि हेवी इअररिंग्स घातले आहेत. आपण यावर लहान इअररिंग्सही ट्राय करू शकता. गुलाबी बांगड्या घालून रेखाने हा लूक कम्प्लीट केला आहे. 7 / 10स्काय ब्लू आणि गोल्डन कलरच्या साडीमध्ये रेखा जणू अप्सरा दिसत आहे. या साडीवर रेखाने वेणी घातली आहे. शिवाय हिरव्या रंगाचा मांग टीकाही लावला आहे. हेवी ज्वेलरीने तिने हा लूक कम्प्लीट केला आहे. 8 / 10गुलाबी आणि लाइम कलर कॉम्बिनेशन असलेली साडी खूप सुंदर दिसत आहे. यामध्ये रेखाने कपलावर मांगटिका, केसांचा अंबाडा आणि त्यावर गजरा माळला आहे. 9 / 10नारंगी आणि गुलाबी रंगाच्या बनारसी साडीमध्ये रेखाचं सौंदर्य आणखीन खुललं आहे. डबल शेड कॉम्बिनेशन असणारी ही बनारसी साडी आपण दिवाळीसाठी खरेदी करू शकता. या साडीवर रेखाने चोकर नेकलेस, बांगड्या, मांगटिका आणि केसांमध्ये गजरा माळला होता. आपण हा लूक नक्कीच ट्राय करू शकता.10 / 10रेशीम फॅब्रिकपासून तयार करण्यात आलेल्या या साडीमध्ये रेखा मोहक दिसत आहे. ब्लाउजचा डिझाईनही सुंदर आणि हटके आहे. पर्पल आणि व्हाईट गोल्डन कलर कॉम्बिनेशनच्या साडीमध्ये रेखा सुंदर आणि आकर्षक दिसत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications