शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

टी बॅग्स फेकून नका-करा 'असा' वापर, स्किन ते गार्डनिंग अनेक समस्यांवर खास उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2024 12:48 PM

1 / 8
आजकाल सगळेच हेल्दी राहण्यासाठी ग्रीन टी पिणे पसंत करतात. बरेचजण चहा, कॉफी पिण्यापेक्षा ग्रीन टी पिणे पसंत करतात. ग्रीन टी वजन कमी करण्यासाठी किंवा बॉडी डिटॉक्स करण्यासाठी वापरला जाणारा महत्वाचा घटक आहे. आपल्यापैकी बरेचजण ग्रीन टी पिण्यासाठी दररोज लागते म्हणून लहान चौकोनी आकाराच्या टी बॅग्स एकदाच मागवून ठेवतो. या लहान चौकोनी टी बॅग्स कपभर गरम पाण्यांत बुडवून ठेवल्यास ग्रीन टी पिण्यासाठी लगेच तयार असते. अशाप्रकारे आपण झटपट ग्रीन टी तयार करून पितो. परंतु नंतर या टी बॅग्स आपण फेकून देतो. या छोट्याशा टी बॅग्स फेकून देण्यापेक्षा आपण त्याचा इतर गोष्टींसाठी वापर करु शकतो. या टी बॅग्स फेकून न देता त्याचा नेमका कसा वापर करावा ते पाहूयात(7 Ways To Reuse Green Tea Bags Instead Of Throwing Them).
2 / 8
टी बॅग वापरुन झाल्यानंतर अशी टी बॅग फ्रिजरमध्ये ठेवून थंड करून चेहऱ्याच्या त्वचेला लावा. यामुळे त्वचेला एक प्रकारचा तजेलदारपणा आणि चमक मिळते, याचबरोबर चेहऱ्याला आलेली सूज कमी करण्यास मदत करते.
3 / 8
वापरुन झालेली टी बॅग रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून २ ते ३ तास थंड करा. अशी रेफ्रिजरेटमध्ये ठेवून गार झालेली टी बॅग थकलेल्या किंवा सुजलेल्या डोळ्यांवर ठेवल्यास आपल्या डोळ्यांना आराम मिळतो. त्याचबरोबर या टी बॅग्सचा वापर करुन डोळ्यांखालील डार्क सर्कल्स आणि सूज कमी होते.
4 / 8
वापरलेल्या ग्रीन टी बॅग्स आपल्या बाल्कनी किंवा गार्डन मधील रोपांच्या कुंडयांच्या मातीत मिसळा. त्यामुळे मातीतील पोषणमूल्य वाढतात आणि रोपांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे सर्व घटक त्यांना या मातीतून मिळण्यास मदत होते.
5 / 8
वापरुन झालेल्या ग्रीन टी बॅग फ्रिजमध्ये ठेवल्याने फ्रिजमधून येणारी कुबट दुर्गंधी शोषून घेते, त्यामुळे फ्रिजमधून येणारी कुबट दुर्गंधी किंवा घाणेरडा वास नाहीसा होतो.
6 / 8
ग्रीन टी बॅग पाण्यात उकळवून त्या पाण्याने केस धुतल्याने केस चमकदार आणि मजबूत होतात. यामुळे केसांतील कोंड्याचे प्रमाण देखील कमी होण्यास मदत मिळते.
7 / 8
ग्रीन टी बॅग गरम पाण्यात टाका आणि त्या पाण्यांत २० ते २५ मिनिटे पाय भिजवून ठेवा. यामुळे पायांना वारंवार घाम येऊन जी दुर्गंधी येते ती दूर करण्यास हा एक सोपा उपाय आहे. त्याचबरोबर पायांना आरामही मिळतो.
8 / 8
वापरलेल्या ग्रीन टीच्या बॅग घराच्या कोपऱ्यात ठेवा. त्याचा येणारा वास डास आणि किटकांना दूर ठेवण्यास मदत करतो.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल