शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

केस अजिबात वाढत नाहीत- खूप पातळ झाले? ७ पदार्थ रोज खा, भराभर वाढून लांबसडक होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2024 9:05 AM

1 / 8
केस खूप गळत असतील किंवा केसांना अजिबातच वाढ नसेल तर हे काही पदार्थ तुमच्या आहारात नियमितपणे असायलाच हवेत, असं आहारतज्ज्ञ सांगत आहेत. ते पदार्थ नेमके कोणते ते पाहा..
2 / 8
सगळ्यात पहिला पदार्थ आहे अक्रोड. अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई असतं. जे फक्त केसांसाठीच नाही तर त्वचेच्या आरोग्यासाठीही अतिशय उत्तम मानलं जातं.
3 / 8
दुसरा पदार्थ आहे मेथ्या किंवा मेथी दाणे. मोड आलेले मेथी दाणे काही दिवस नियमितपणे खा. अगदी एखादा चमचा खाल्ले तरी ते पुरेसं आहे. शिवाय भिजवलेल्या मेथी दाण्यांचा लेप दह्यात कालवून केसांच्या मुळाशी लावा. यामुळे केस भराभर वाढतील.
4 / 8
सुर्यफुलाच्या बियादेखील केसांच्या वाढीसाठी अतिशय उत्तम मानल्या जातात. त्यामुळे केस वाढून त्यांचं गळणं बऱ्याच प्रमाणात कमी होतं.
5 / 8
अंजीर हे खऱ्या अर्थाने सुपरफूड आहे असं वेगवेगळे आहारतज्ज्ञ नेहमीच सांगतात. अंजीर नियमितपणे खाल्ल्याने केसांनाच नाही तर आरोग्यालाही भरपूर फायदा होईल.
6 / 8
भोपळ्याच्या बियादेखील केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम मानल्या जातात. या बिया भाजून खाणे अधिक चांगले.
7 / 8
नाचणीमध्ये असणारे कॅल्शियम आणि इतर पदार्थ केसांसाठी खूप फायदेशीर ठरतात. नाचणी इडली, नाचणी पराठा, नाचणी थालिपीठ, नाचणी ढोकळा अशा वेगवेगळ्या पदार्थांमधून नाचणी नेहमी खावी.
8 / 8
आवळा हे केसांसाठी खऱ्या अर्थाने सुपरफूड मानलं जातं.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHair Care Tipsकेसांची काळजीfoodअन्नHome remedyहोम रेमेडी