8 Foods You Shouldn't Keep in the Fridge, Low in Nutrition - More Likely to Suffer
फ्रिजमध्ये ठेवू नयेत असे ८ पदार्थ, पोषण होते कमी - त्रास होण्याची शक्यता जास्त By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2023 6:45 PM1 / 9आपण दिवसातून ३ वेळा आहाराचे सेवन करतो. त्या आहारात विविध पदार्थांचा समावेश असतो. ताजे आणि गरम अन्न आपल्या शरीराला पौष्टिक तत्वे देतात. ज्याने आपल्याला दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते. मात्र, कधी कधी हे पदार्थ शिल्लक राहतात. त्यावेळेस आपण हे पदार्थ डब्ब्यात झाकून फ्रिजमध्ये ठेवतो. जास्तवेळ फ्रिजमध्ये ठेवल्याने पदार्थाची चव बदलते. काही पदार्थ फ्रिजमध्ये ठेऊन खाऊ नये असा सल्ला दिला जातो. फ्रीज हा आपल्या स्वयंपाक घरातील एक महत्वाचा घटक जरी असला तरी, देखील त्यात काही पदार्थ ठेऊन खाणे आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते.2 / 9ब्रेड फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही असा सल्ला दिला जातो. कारण ब्रेड हे खोलीच्या तपमानावर योग्य राहील अशा प्रकारे तयार केले जाते. जेव्हा आपण दुकानात ब्रेड घेण्यासाठी जातो तेव्हा ब्रेड रेफ्रिजरेटरमध्ये न ठेवता काउंटरवर ठेवली जाते. ब्रेड फ्रिजमध्ये ठेवल्यास ते लवकर कोरडे पडतात. फ्रीजमध्ये ठेवल्यास त्याची नैसर्गिक चव बदलते.3 / 9मध हे एक नैसर्गिक पदार्थ आहे. आपण मध खोलीच्या तापमानात दीर्घकाळ साठवून ठेऊ शकता. मध सुरक्षित आणि दीर्घकाळ उत्तम ठेवण्यासाठी काचेच्या भांड्यात ठेऊ शकता. फ्रीजमध्ये मध ठेवल्यास ते गोठते आणि त्याची चवही बदलते.4 / 9टोमॅटो सामान्यतः प्रत्येक घरात फ्रीजमध्ये साठवले जातात. मात्र असे करण्याची आवश्यकता नाही. टोमॅटोची नैसर्गिक चव राखण्यासाठी त्यांना बाहेरच ठेवा. 5 / 9बहुतेक घरांमध्ये कॉफी फ्रीजमध्ये ठेवली जाते. मात्र, असे न करता आपण कॉफी आहे त्या डब्यांमध्ये साठवू शकता. कॉफीला खोलीच्या तापमानावर साठवणे उत्तम ठरेल.6 / 9काही घरांमध्ये सुका मेवा एअर टाईट बॅगमध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवले जाते. मात्र, ते फ्रीजशिवाय देखील बरेच महिने चांगले राहतात. जास्त काळ टिकवण्यासाठी ड्राय फ्रूट्स हवाबंद काचेच्या बरणीत ठेवा.7 / 9चॉकलेट हेझलनट स्प्रेड अथवा जाम, सॉसचा वापर आपण ब्रेड किंवा टोस्टसोबत खाण्यासाठी करतो. मात्र, हे पदार्थ फ्रीजमध्ये न ठेवता सामान्य खोलीच्या तापमानावर ठेऊ शकता. फ्रीजमध्ये ठेवल्याने हे पदार्थ खराब होण्याची शक्यता जास्त असते.8 / 9आलं आणल्यानंतर बहुतेक लोक ते धुवून फ्रीजमध्ये ठेवतात. पण असे करण्याची गरज नाही. कारण आलं लवकर खराब होत नाही. फ्रीजमध्ये आले ठेवल्याने त्याची चव आणि पौष्टिक मूल्य कमी होते.9 / 9सरबत आपण जास्त उन्हाळ्यात पितो. त्याला आपण काचेच्या बाटलीमध्ये साठवून ठेवतो. मात्र सरबत फ्रीजमध्ये ठेवू नये. असे केल्याने ते गोठले जातात.त्यामुळे सरबताची बॉटल फ्रीजमध्ये ठेवू नये. आणखी वाचा Subscribe to Notifications