8 Health Benefits Of Buttermilk For Weight Loss
जेवणानंतर की जेवणाआधी? ताक नेमकं कधी प्यायल्याने फायदा होतो? ताक प्या - करा वजन कमी झरझर By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2024 3:39 PM1 / 10ताक (Buttermilk) हे दुग्धजन्य पदार्थ आहे. ताक पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत (Health Tips). प्राचीन काळापासून जेवणासोबत दही किंवा ताक वाढण्याची पद्धत आहे (Buttermilk). ताकाची चव आंबट जरी असली तर, जेवणानंतर पचनक्रिया सुधारण्यास मदत करते (Digestion Problem). यासह शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यासही मदत होते(8 Health Benefits Of Buttermilk For Weight Loss).2 / 10ताक हा प्रोटीनचा उत्तम सोर्स आहे. यामुळे स्नायू बळकट होतात. मुख्य म्हणजे पचनक्रिया सुधारते. ज्यामुळे वेट लॉस आणि पचनक्रिया सुधारण्यासही मदत होते. ताकामध्ये दुधापेक्षा कमी कॅलरीज असून, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी १२ आणि पोटॅशियम यांचे प्रमाण अधिक असते. 3 / 10जेवणासोबत आपण एक ग्लास ताक पिऊ शकता. ग्लासभर ताक प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. अनेकदा लोकांना अन्न खाल्ल्यानंतर गॅस किंवा ॲसिडिटीचा त्रास होतो, त्यामुळे जेवणासोबत ग्लासभर ताक प्या. 4 / 10ताकामध्ये प्रोबायोटिक्स असते. ज्यामुळे शरीराचे तापमान वाढत नाही. जेव्हा आपण खूप तेलकट आणि मसालेदार पदार्थ खातो. तेव्हा शरीरातील तापमान वाढते. त्यामुळे ग्लासभर ताक प्यायल्याने या समस्यांपासून आराम मिळतो. 5 / 10ताकामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असते. हे प्यायल्याने हाडं मजबूत होतात. आणि स्नायूंना बळकटी मिळते. नियमित एक ग्लास दूध प्यायल्याने दात मजबूत होतात. 6 / 10ताक हे एक असे दुग्धजन्य पदार्थ आहे, ज्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण फार कमी असते. ताक वजन कमी करण्यासाठी आणि शरीराला उर्जा देण्यासाठी देखील उपयुक्त ठरते. दुपारच्या जेवणासोबत ग्लासभर ताक प्यायल्याने लवकर भूक लागत नाही.7 / 10ताक रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. ऋतू बदलांनुसार होणारे आजार दूर करण्यासाठी आपण ताक पिऊ शकता. 8 / 10दुपारच्या जेवणात ग्लासभर ताक प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते. ताक शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतील. जे आपल्या यकृतावर आणि इतर अवयवांवर परिणाम करतात.9 / 10ताक प्यायल्याने शरीरात डिहायड्रेशन होत नाही. रात्रीच्या जेवणासोबत ग्लासभर ताक प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते. 10 / 10दुपारच्या जेवणात १ ग्लास ताक प्यायल्याने बीपीच्या समस्येपासून आराम मिळतो. ज्यांना रक्तदाब असंतुलनाची समस्या आहे त्यांनी जेवणासोबत १ ग्लास ताक प्यावे. आणखी वाचा Subscribe to Notifications