8 Types of Vada Pav You Should Definitely Try
जागतिक वडापाव दिन : वडापावचे पाहा ८ प्रकार; सांगा तुमचा फेवरिट खमंग वडापाव कोणता? By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2024 5:31 PM1 / 10गरमागरम वडापाव महाराष्ट्रीयन लोकांसाठी म्हणजे जीव की प्राण (Vada pav). महाराष्ट्रात अनेक प्रकारचे वडापाव केले जातात. जे लोकं मिटक्या मारत आनंदात खातात. एक वडापाव खाल्ल्याने पोट टम्म भरतं (Cooking Tips). गरमागरम बटाटयाचं सारण, बेसनाच्या बॅटरमध्ये बुडवून तळले जातात. कुरकुरीत बटाटा वडा कोणाला नाही आवडत(8 Types of Vada Pav You Should Definitely Try).2 / 10प्रत्येक भागात बटाटा वडा करण्याची पद्धत वेगळी असते. तर काही वडा पाव त्याच्यासोबत मिळणाऱ्या ओल्या - सुक्या चटणीसाठी चर्चित असतात. आज जागतिक वडा पाव दिन. या खास दिनानिमित्त वडापावचे ८ प्रकार पाहूयात. 3 / 10मराठमोळ्या व्यक्तींसाठी वडा पाव म्हणजे पोट भरणारं खाद्य पदार्थ. दादरमधील अशोक वैद्य यांनी वडापावचा शोध लावला. आजही त्यांच्या क्लासिक चवीचा वडापाव जिभेचे चोचले पुरवतो, आणि याने पोटही भरते.4 / 10सध्याच्या पिढीला चीज खाण्याचं प्रचंड वेड आहे. बर्गरमध्ये ज्याप्रमाणे चीजचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे वडा पावमध्ये देखील चीजचा वापर केला जातो. मुंबईत चीज बर्स्ट वडा पाव फार फेमस आहे. 5 / 10वडा पावाला चटकदार ट्विस्ट द्यायचं असेल तर, पावाला मसाला लावून भाजून घ्या. त्यात वडा भरून चमचमीत वडा पाव खा. आपण वडा पाव करतानाही त्यात विविध मसाले मिक्स करू शकता. यामुळे वडा पावची चव आणखी वाढेल. 6 / 10काही ठिकाणी वडा पावला उलटा ट्विस्ट देण्यात येतो. सध्या लोकं उलटा वडा पाव खातात. काही स्टॉलवर पावावर बटाटा भाजीचं सारण लावून त्याला बेसनाच्या बॅटरमध्ये बुडवून तळतात. काही लोकं पावाला आधी चटणी लावतात, आणि मग बटाटा भाजी लावून तळतात. त्यामुळे याला पाव वडा असे म्हणतात.7 / 10वडा पाव सर्व्ह करताना काही जण सोबत चटणी, तळलेल्या हिरव्या मिरच्या, कैरी किंवा सुकी चटणी देतात. आपण वडा पावसोबत मक्याचा चिवडा खाऊ शकता. तळलेल्या मक्यात आपण बारीक चिरलेला कांदा, लाल तिखट आणि बारीक चिरलेली कैरी मिक्स करून खाऊ शकता.8 / 10सध्या चीज खाणाऱ्यांचा खवय्यावर्ग वाढत चालला आहे. आपण चीज फॉनडू वडापाव नक्की ट्राय करून पाहू शकता. यासाठी झणझणीत मिनी वडा पाव तयार करा. एका बाऊलमध्ये मेल्ट चीज घ्या. एका स्टिकला चटणी लावलेला पाव आणि मिनी वडा घेऊन मेल्ट केलेल्या चीजमध्ये बुडवून खा. 9 / 10जर आपण तिखट प्रेमी असाल तर, एकदा ठेचा वडापाव नक्की ट्राय करून पाहा. यामध्ये तिखट चटणी ऐवजी मिरचीच्या ठेचाचा वापर केला जातो. हा वडापाव देखील चवीला उत्तम लागतो.10 / 10ग्रील सॅण्डविच आपण खातोच. पण कधी ग्रील वडापाव ट्राय केलं आहे का? यामध्ये वडापावला ग्रील करून तयार केले जाते. हा वडापाव सध्या लोकप्रिय आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications