नाशिक : काठे गल्ली-पखालरोड भागात मध्यरात्री दगडफेक करणाऱ्या दंगलखोरांच्या ५७ दुचाकींसह १३ संशयित समाजकंटकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तुफान दगडफेकीत ३१ पोलीस अधिकारी, कर्मचारी मध्यम ते किरकोळ जखमी झाले आहेत.
1 / 11'व्हॅलेंटाईन्स डे' म्हणजे प्रेमाचा दिवस. या दिवशी कपल्स आपल्या जोडीदारावरचे प्रेम एकमेकांसमोर अगदी मनमोकळेपणाने व्यक्त करतात. या स्पेशल दिवशी आपण खास दिसावे अशी प्रत्येकीची (9 Gorgeous red outfits for Valentine's Day ) इच्छा असतेच. या दिवसाच्या सुंदर आठवणींसाठी मग विशेष प्लॅन्स आखले जातात. आपला 'व्हॅलेंटाईन्स डे' स्पेशल करण्यासाठी मग अगदी कपड्यांपासून ते गिफ्ट्सपर्यंत सगळ्याच गोष्टींची जय्यत तयारी केली जाते. 2 / 11 'व्हॅलेंटाईन्स डे' खास प्रेमाचा दिवस असल्याने प्रेमाचे प्रतीक (9 Trendy Yet Budget-Friendly Valentine’s Day Outfit Ideas ) असणाऱ्या लाल रंगाला पसंती दिली जाते. या दिवशी लाल रंगाचे गाऊन, ड्रेस घातले जातात. जर तुम्हाला सुद्धा 'व्हॅलेंटाईन्स डे' स्पेशल करायचा असेल तर या दिवशी लाल रंगाचे वेगवेगळ्या पॅटर्नचे कोणते गाऊन घालू शकता, ते पाहूयात. 3 / 11या 'व्हॅलेंटाईन डे' ला तुम्ही सुंदर असा कॉर्सेट सेट (Corset Set) ट्राय करु शकता. यामध्ये तुमचा लूक खूपच सुंदर आणि हटके दिसेल. त्यामुळे यंदा जर तुम्हाला सर्वांपेक्षा हटके आणि सुंदर दिसायचे असेल तर लाल रंगाचा असा 'कॉर्सेट सेट' एक उत्तम पर्याय असू शकतो. 4 / 11 या ड्रेसिंगला 'सॅटिन स्कर्ट' असे म्हटले जाते. यामध्ये धोती टाईप स्कर्ट असतो. तसेच त्यावर टॉप नसून तुम्ही हटके असे चुन्या असलेले बिकीनी परिधान करु शकता. यामध्ये तुमचा लूक खूप खास दिसेल. 5 / 11 एका स्लीव्हमध्ये पुष्कळ पफ असलेला आणि कंबरेला एक सुंदर पुढचा फ्लॅप असलेला हा वन शोल्डर ड्रेस ट्रेंडी आणि स्मार्ट व्हॅलेंटाईन डेच्या ड्रेसिंगसाठी एक छान पर्याय असू शकतो. तुम्ही त्यावर मॅचिंग सँडल घालू शकता. हा ड्रेस कमीत कमी ऍक्सेसरीझ मध्ये खूप हटके असा लूक देतो.6 / 11 कॉलर असलेला हा लाल रंगाचा मिनी रॅप ड्रेस तुम्हाला फ्लर्टीश, ट्रेंडी आणि स्मार्ट लूक देतो. आपण 'व्हॅलेंटाईन्स डे' ला असा हटके लूक देखील नक्की ट्राय करु शकता. 7 / 11जंपसूट हा कपड्यांच्या प्रकार ऑल टाईम कम्फर्टेबल असतोच. एरवी देखील आपण जंपसूट घालतोच, पण 'व्हॅलेंटाईन्स डे' ला आपण लाल रंगाचा तसेच त्यावर हलकेच वर्क किंवा डिजाईन, प्रिंट असलेला जंपसूट घालू शकतो. 8 / 11 बाजारात सध्या प्लाझो पॅटर्नला फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कुर्ती, स्ट्रेट कट कुर्त्यावर प्लाझो घालून फ्युजन फॅशनचा टच दिला जाऊ शकतो. व्हॅलेंटाइन डेटसाठी तुम्हाला अतिशय साधी, सहज अशी फॅशन करायची असल्यास प्लाझो पर्याय बेस्ट आहे. विविध रंगांचे, डिझाइनमधील प्लाझो तुम्हाला नक्की आवडतील. 9 / 11ज्यांना शॉर्ट्स प्रचंड आवडतात, त्यांच्यासाठी हा पर्याय बेस्ट आहे. हॉट पँट आणि स्लीव्हलेस टॉप असं हे पॅटर्न आहे. हा एकदम हटके आणि ट्रेंडी लूक असल्याने तुम्हाला एक फ्रेश लुक मिळेल.10 / 11जर आपल्याला कपड्यांमध्ये शॉर्ट फ्रॉक पॅटर्न आवडत असेल तर आपण अशा शॉर्ट फ्रॉकची देखील निवड करु शकता. लाल रंगाचा हा शॉर्ट फ्रॉक आपण 'व्हॅलेंटाईन्स डे' च्या पार्टीला देखील घालू शकता. 11 / 11जर आपल्याला एकदम स्पेशल दिसायचे असेल तर आपण असे मोठे घेरदार पॅटर्नचे गाऊन देखील घालू शकता. या गाऊनमुळे तुमचा लूक अधिकच खुलून येईल.