9 household plants for terrace garden that grows very well with Low or minimum maintenance
गार्डनिंगसाठी खूप वेळ नाही? ९ रोपं लावा, खूप काळजी न घेताही नेहमीच राहतील हिरवीगार- फ्रेश By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2022 3:27 PM1 / 11१. गार्डनिंगची आवड अनेकांना असते. पण नेमकं होतं काय की प्रत्येकामागेच काही ना काही गडबड, धावपळ असल्याने मग झाडांना पुरेसा वेळ देता येत नाही. त्यामुळे मग योग्य काळजी न घेतली गेल्याने रोपं सुकून जातात आणि आपल्या बागेची सगळी शोभाच जाते.2 / 11२. त्यामुळे ज्यांना गार्डनिंग करण्यासाठी खूप वेळ नाही, पण तरीही एखादं छानसं- छाेटंसं टेरेस गार्डन फुलविण्याची हौस आहे, अशा मंडळींनी आपल्या घरातल्या बागेत लावण्यासाठी ही काही रोपटी निवडावीत.. ही रोपटी अशी आहेत ज्यांच्याकडे खूप लक्ष देण्याची गरज नाही. कमीत कमी काळजी घेऊनही ती नेहमीच हिरवीगार आणि फ्रेश दिसतात.3 / 11३. यातलं सगळ्यात पहिलं रोपटं म्हणजे सदाफुली. अगदी नावाप्रमाणेच ती नेहमी फुललेली असते. रोपटं छोटंसं असलं तरी तिच्यावर २- ३ फुलं तरी कायम दिसतातच. वेगवेगळ्या रंगात सदाफुली मिळते आणि खरोखरच कुठेही फुलून येते.4 / 11४. मनी प्लॅन्ट हा असाच एक नेहमी हिरवागार राहणारा वेल. याला जास्त पाणी घालण्याची गरज नाही. घरात तसेच अंगणात कुठेही मनी प्लॅन्ट छान फुलून येतो. तुम्ही तो वर चढवू शकता किंवा मग खाली लोंबकळताही सोडू शकता.5 / 11५. स्नेक प्लॅन्टलाही जास्त पाणी आणि खत देण्याची गरज नाही. हे रोपटं कमी सावलीत खूप छान वाढतं. शॉर्ट आणि लाँग अशा दोन्ही प्रकारात हे झाड उपलब्ध आहे.6 / 11६. स्क्विरल टेल (squrriel tail) या झाडाचीही खूप काळजी घेण्याची गरज नाही. ३ ते ४ तास या झाडाला ऊन मिळालं तरी ते पुरेसं ठरतं.7 / 11७. स्पायडर प्लॅन्टला खूप जास्त वाढ असते. अगदी कुठेही हे झाड सहज पसरत जातं. कुंडीतली माती सदा ओलसर राहील एवढं पाणी घातलं की हे झाड मस्त फुलतं.8 / 11८. औषधी वनस्पती असणाऱ्या कोरफडीकडेही विशेष लक्ष देण्याची गरज नसते.9 / 11९. ऑफिस टाईम हे छोटंसं रोपटंही तसंच. याला सतत फुलं येतात आणि जवळपास सगळ्याच ऋतूंमध्ये हे रोपटं हिरवगार आणि फुललेलं असतं.10 / 11१०. ऑफिस टाईमप्रमाणेच चिनी गुलाबही नेहमीच फुललेला असतो. या रोपट्याचीही खूप काळजी घ्यावी लागत नाही.11 / 11११. जास्वंदालाही खूप काळजी घेण्याची गरज नसते. फक्त या झाडाला ४ ते ५ तास कडक ऊन मिळेल अशा जागी ठेवावं आणि कुंडीतली माती नेहमीच ओलसर राहील, अशा पद्धतीने पाणी घालावं. आणखी वाचा Subscribe to Notifications