शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बटाटे उकडण्यापासून लसूण सोलण्यापर्यंत स्वयंपाकघरातल्या ‘या’ ९ कामांसाठी मायक्रोवेव्हचा करा वापर, स्वयंपाक होईल झटपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2024 6:48 PM

1 / 10
घरातल्या मायक्रोवेव्हचा वापर आपण शक्यतो फारच कमी प्रमाणात करतो. काहीवेळा फक्त केक, बिस्कीट, मफिन्स असे पदार्थ तयार करण्यासोबतच अन्नपदार्थ गरम करण्यासाठी वापरतो. एवढाच काय तो या मायक्रोवेव्हचा वापर आपण करतो. याशिवाय मायक्रोवेव्ह असाच किचनमध्ये पडून असतो. परंतु या मायक्रोवेव्हचा वापर करून आपण किचनमधील अनेक काम अगदी चुटकीसरशी करु शकतो. अन्नपदार्थ गरम करण्यासोबतच, आपण मायक्रोवेव्हचा किचनमधील इतर कामांसाठी कसा वापर करु शकतो ते पाहूयात (9 Things You Didn't Know Your Microwave Could Do).
2 / 10
बटाटे स्वच्छ धुवून त्यांना काटा चमच्याच्या मदतीने छिद्र पाडून ते एका डिशमध्ये ठेवून मायक्रोवेव्ह मध्ये ४ मिनिटांसाठी ठेवावे. यामुळे बटाटे पटकन उकडले जातात. यामुळे बटाटे उकडण्यासाठी आपल्याला कुकरच्या शिट्ट्या मोजण्याची गरज भासणार नाही.
3 / 10
रात्री मळून घेतलेली उरलेली कणीक फ्रिजमध्ये ठेवतो. अशी कणीक सकाळी फ्रिजमधून काढल्यास खूपच कडक आणि थंडगार असते. अशावेळी ही कणीक ३० सेकंदांसाठी मायक्रोवेव्ह ओवन मध्ये ठेवावीत.
4 / 10
लिंबामधून जास्तीतजास्त रस काढता यावा, यासाठी लिंबू कापण्याआधी ३० सेकंदांसाठी मायक्रोवेव्ह ओवन मध्ये ठेवावा. त्यानंतर लिंबू कापून त्याचा रस काढल्यास अधिक प्रमाणांत रस मिळतो.
5 / 10
लसूण सोलणे हे फारच वेळखाऊ आणि किचकट काम असते. यासाठी लसूण पाकळ्या मोकळ्या करून त्या ३० सेकंदांसाठी मायक्रोवेव्ह ओवन मध्ये ठेवाव्यात. त्यानंतर लसूण सोलावी, यामुळे लसूण पाकळ्यांची सालं झटपट निघते.
6 / 10
मेथी, पुदिना, गुलाबाच्या पाकळ्या सुकवून ड्राय करण्यासाठी मायक्रोवेव्हचा वापर करु शकतो. यासाठी मेथी, पुदिन्याची पाने एका डिशमध्ये ठेवून २ मिनिटांसाठी मायक्रोवेव्ह करून घ्यावीत. मेथीच्या पानांपासून आपण झटपट घरच्या घरीच कसुरी मेथी तयार करु शकतो.
7 / 10
उरलेला शिळा ब्रेड तसाच ठेवून तो कोरडा, रुक्ष होतो. असा शिळा ब्रेड खाण्याआधी त्यावर किंचित पाणी शिंपडून १५ सेकंद मायक्रोवेव्हमध्ये ठेवावा. यामुळे ब्रेड आधीसारखा मऊ, लुसलुशीत होऊन खाण्यासाठी फ्रेज होतो.
8 / 10
मधल्या वेळच्या लहान भुकेसाठी आपण झटपट तयार होणारे नो ऑयली बेक्ड चिप्स पटकन तयार करु शकता. यासाठी एका डिशला चमचाभर तेलाने ग्रीस करुन घ्यावे. त्यावर बीटरुट, बटाट्याच्या गोल चकत्या कापून त्यावर थोडेसे मीठ भुरभुरवून ४ मिनिटांसाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवून द्यावे. मस्त क्रिस्पी, कुरकुरीत वेफर्स खाण्यासाठी तयार आहेत.
9 / 10
लहान बाळाची दुधाची बाटली, बाऊल, चमचा स्टरलाईझ करण्यासाठी आपण मायक्रोवेव्हचा वापर करु शकतो.यासाठी एका मोठ्या बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात दुधाची बाटली, चमचे, बाऊल सगळे व्यवस्थित बुडवून ४ मिनिटांसाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवून द्यावे.
10 / 10
ड्रायफ्रुटस झटपट भाजून घेण्यासाठी एका डिशमध्ये ठेवून ते मिनिटभरासाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवून द्यावे. यामुळे ड्रायफ्रुटस झटपट कोरडे भाजून होतात.
टॅग्स :foodअन्नSocial Viralसोशल व्हायरलkitchen tipsकिचन टिप्स