Akshaya Devdhar Wedding Look : Akshaya Devdhar and Hardik Joshi wedding pics jewellery design
नवरी नटली! पाठकबाईंनी लग्नात घातलेले पारंपरिक मराठमोळे दागिने; देखणे असे की पाहत राहावे.. By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2022 1:23 PM1 / 8राणादा आणि पाठक बाई म्हणजे हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर (Akshaya Devdhar and Hardik Joshi wedding) आज २ डिसेंबरला लग्नबंधनात अडकले. चाहत्यांनी त्यांना भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा दिल्या आहेत. 2 / 8हार्दिक आणि अक्षयाच्या वेडींग लूकनं सगळ्याचंच लक्ष वेधून घेतलं आहे. पारंपारीक मराठमोळ्या दागिन्यांमध्ये दोघांचाही लूक खुलला होता. 3 / 8लाल रंगाच्या साडीला साजेसं चंद्रकोर प्रिंट केलेलं ब्लाऊज अक्षयानं लग्नप्रसंगासाठी निवडलं.4 / 8थ्री फोर स्लिव्हवर आणि मागच्या बाजूलाही चंद्रकोर अधिक उठून दिसत होती. 5 / 8अक्षयानं वज्रटीक ज्वेलरी गळ्यात घातली होती आणि त्याला साजेसा पारंपारीक हार घातला होता. 6 / 8हार्दीक अक्षयाला मंगळसुत्र घालतानाचा सुंदर क्षण कॅमेरात टिपण्यात आला. दोन वाट्याचं मोठं मंगळसुत्र हार्दीकनं अक्षयाला घातलं. 7 / 8तिच्या गळ्यातल्य काळ्या मळ्यांच्या नेकलेसनं ही लक्ष वेधून घेतलं. कपाळावर चंद्रकोर आणि सिंपल मेकअप यावेळी तिनं कॅरी केला होता. 8 / 8हार्दिकनं रुदाक्षांच्या माळांचा नेकलेस गोल्डन कुर्त्यावर परिधान केला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications