Akshaya Tritiya Shopping: Latest, trendy and traditional gold bangle designs with minimum weight
अक्षय्य तृतीया: सोन्याच्या बांगड्यांच्या सुंदर डिझाइन्स, पारंपरिकेतला आधुनिक रुप.. पाहा फोटो By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2022 4:09 PM1 / 10१. साडेतीन मुहुर्तांपैकी एक म्हणजे अक्षय्य तृतीया. त्यामुळेच यादिवशी सोनं खरेदी करण्याला विशेष मुहूर्त आहे. यंदाच्या अक्षय्य तृतीयेला सोन्याच्या बांगड्या घेण्याचा विचार असेल, तर हे काही पर्याय नक्कीच बघा..2 / 10२. जास्त वजनदार बांगड्यांपेक्षा कमी वजनात बसतील अशा नाजूक बांगड्या खरेदी करण्याचा विचार असेल, तर असे ब्रेसलेट प्रकारात अनेक डिझाईन्स आहेत.3 / 10३. अशा प्रकारचे ब्रेसलेटपेक्षा अधिक घनसर असणारे गोठ देखील हल्ली ट्रेण्डी आहेत. 4 / 10४. गोठ घेण्याचा विचार असेल तर असे लेटेस्ट डिझाईन्स ट्राय करा. हे डिझाईन्स दिसायला नाजूक पण वापरायला मजबूत असतात.5 / 10 ५. अशा पद्धतीच्या कड्याची नेहमीच फॅशन असते. एकाच हातात हा गोठ घालतात आणि साधारणपणे एक ते दिड तोळ्यात तो येतो. 6 / 10६. तोडे हा पारंपरिक बांगडी प्रकार. त्याचं वजनही भरपूर असतं. पण आता त्यातही अनेक प्रकार आले असून एक ते दिड तोळ्यात तुम्ही तोड्याची खरेदी करू शकता.7 / 10७. अनेक मालिकांमधे आपण अशा पद्धतीच्या बांगड्या पाहतो. कंगन प्रकारच्या या बांगड्या दिसायला खूपच वजनदार दिसतात. पण एक ते सव्वा तोळ्यात त्या घडवून घेता येतील. एकच बांगडी घातली तरी हात अगदी भरून पाठवते. 8 / 10८. हे देखील एक त्यातलेच डिझाईन. या बांगड्या एका तोळ्यातही घडवता येतात. बांगड्यांवरचे डिझाईन अतिशय सुबक असल्याने हातांचे सौंदर्य नक्कीच वाढेल. 9 / 10९. पाटलीच्या डिझाईनची ही बांगडी प्लेन असली तरी हातात खूपच क्लास दिसते.10 / 10 १०. बांगड्यांचे हे आणखी एक सुंदर डिझाईन. सुंदर, आकर्षक आणि ट्रेण्डी आणखी वाचा Subscribe to Notifications