शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Aliya farooq : 'ही' आहे काश्मिरची पहिली महिला जीम ट्रेनर; पाहा वर्कआऊटचे खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 4:06 PM

1 / 9
जम्मू काश्मिरमध्ये आता मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसून येत आहेत. त्या ठिकाणच्या महिलासुद्धा आता आपल्या आरोग्याबाबत सजग झाल्या आहेत. गेल्या ३० वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षामुळे तिथल्या महिलांची स्थिती चिंताजनक होती..
2 / 9
२०१५ मध्ये राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात दिसून आले की, ७३ टक्के काश्मिरी महिला प्रजननासंबंधी समस्यांना तोंड देत आहेत. आता तिथल्या स्थानिक महिला स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जिममध्ये जात आहेत. आलिया फारूक नावाची महिला काश्मिरची पहिली महिला फिटनेस ट्रेनर म्हणून ओळखली जात आहे.
3 / 9
लठ्ठपणानं ग्रासलेल्या महिलांना फिट ठेवण्यासाठी ३३ वर्षीय आलिया फारूक प्रेरणा देत आहेत. पूर्वग्रह बाजूला सारून आलियानं जीम ट्रेनरच्या स्र्वरूपात आपल्या करीअरची निवड केली आहे.
4 / 9
याबाबत आलिया फारूकं सांगितले की, ''मी २ मुलांची आई आहे. लग्नानंतर लठ्ठपणाच्या समस्यांचा सामना करावा लागला होता. मी खूप उदास असायचे. माझ्या पतीनं मला जीमला जाण्यासाठी प्रेरित केले. पण खरंच पुरूष ट्रेनर महिलांच्या शरीरातील बदल समजू शकतील याची मला खात्री नव्हती.''
5 / 9
पुढे त्यांनी सांगितले की, ''मी दिल्लीला गेले आणि तिथल्या विवाहित महिलांकडून प्रेरणा घेतली. नंतर मी तिथल्या जीममध्ये जाण्याचा निर्णय घेतला. चार महिन्यात मी जवळपास २८ किलो वजन कमी केलं.
6 / 9
'माझ्या पतीनं २०१० ला महिलांसाठी एक जीम उघडली होती. त्यांना एका महिला जीम ट्रेनरची आवश्यकता होती. त्यानंतर मी जीम ट्रेनर बनण्याचं ठरवलं. हे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी मी हैदराबादला गेले. २०१२ मध्ये प्रशिक्षकाच्या स्वरूपात पतीच्या जीमचा कार्यभार मी सांभाळला.''
7 / 9
आलिया काश्मिरच्या वेगवेगळ्या भागातील हजारो महिलांना फिटनेसचं महत्व पटवून दिलं आहे. हृदय रोग, उच्च रक्तदाब, उच्च कॉलेस्ट्रॉल आणि वंध्यत्वासारख्या समस्या काश्मिरच्या महिलांमध्ये जाणवतात. यासाठी व्यायाम आवश्यक आहे.
8 / 9
आलियाची मागणी आहे की प्रत्येक जिल्ह्यात एक महिलांचे फिटनेस सेंटर असायला हवं.
9 / 9
काश्मिरमध्ये महिलांसाठी फिटनेस सेंटर उघडण्यासाठी त्यांनी सरकारकडे निवेदन दिलं आहे. आलियाच्या म्हणण्यानुसार जास्तीत जास्त महिला पुरूष प्रशिक्षक असल्यामुळे जीमला जाणं टाळतात.
टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealthआरोग्यJammu Kashmirजम्मू-काश्मीर