amazing home hacks using refrigerator, amazing tricks of using fridge for different remedies
९० टक्के महिलांना माहितीच नाही फ्रिजचा 'असा'ही वापर होऊ शकतो! फ्रिजचे ५ भन्नाट उपयोग By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2024 4:29 PM1 / 7कोणतीही वस्तू थंड करणे किंवा कोणतेही अन्नपदार्थ जास्तीत जास्त काळ टिकवून ठेवणे, यासाठी फ्रीज वापरावा हे आपल्याला माहितीच आहे. 2 / 7पण या व्यतिरिक्त स्वयंपाक घरातली अनेक अवघड कामे सोपी करण्यासाठी फ्रीजचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करता येतो, हे बहुतांश महिलांना माहिती नाही. ती कामे कोणती याविषयीची माहिती dadecordiaries and dacookingdiaries या instagram पेजवर शेअर करण्यात आली आहे. फ्रिजचे ते भन्नाट उपयोग नेमके कोणते ते पाहा...3 / 7कांदा मधोमध चिरून घ्या. त्याचे बाहेरचे आवरण काढून टाका आणि तो १५ ते २० मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवा. आणि नंतर बाहेर काढून तो कापा. डोळ्यांतून अजिबात पाणी येणार नाही. 4 / 7पराठ्यांचं सारण खूपच चिपचिपित झालं असेल आणि पोळपाट- लाटण्याला चिटकत असेल तर ते सारण आणि पोळपाट, लाटणे काही मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवून द्या. सारण पोळपाट- लाटण्याला चिटकणार नाही. सरसर पराठे लाटता येतील. 5 / 7वाटीत वाटी किंवा पातेल्यात पातेलं अडकून बसले असेल तर अशी भांडी काही वेळ फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर काढून पाहा. चटकन एकमेकांपासून वेगळी होतील. 6 / 7नारळ खोवायचं असेल किंवा चिरायचं असेल तर ते त्यापूर्वी काही मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवा. सरसर चिरून होईल. 7 / 7मिरच्यांची देठं काढून ती एका प्लास्टिकच्या पिशवीत घालून फ्रिजमध्ये ठेवा. हिरव्या मिरच्या बरेच दिवस फ्रेश राहतील. आणखी वाचा Subscribe to Notifications