शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

केस खूप गळतात- पांढरेही झाले? 'या' पद्धतीने आवळा पावडर लावा- काही दिवसांतच होतील दाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2024 1:03 PM

1 / 9
केस गळण्याची समस्या हल्ली खूपच वाढली आहे. काही जणांचे केस तर रोज एवढे जास्त गळतात की ते पाहून लवकरच टक्कल पडेल की काय अशी भीती वाटते.
2 / 9
प्रदुषण, ऊन यांचाही केसांवर परिणाम होतोच. शिवाय त्यांना पुरेसं पोषण देण्यातही आपण कमी पडतो. त्यामुळे केस अकाली पांढरे होण्याची समस्या अनेकांमध्ये दिसून येते.
3 / 9
केसांसंबंधी या तक्रारी दूर करायच्या असतील तर एका खास पद्धतीने आवळ्याचा हेअरमास्क केसांना लावून पाहा. काही दिवसांतच केस गळणं कमी होईल. शिवाय केस अकाली पांढरे होणंही कमी हाेईल.
4 / 9
हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी एका वाटीमध्ये २ चमचे आवळा पावडर आणि २ चमचे पाणी घ्या.
5 / 9
यानंतर या मिश्रणामध्ये २ चमचे दही टाका. दह्यामुळे केसांची मुळा पक्की होण्यास मदत होते.
6 / 9
आता त्यामध्ये एक ते दिड चमचा खोबरेल तेल टाका.
7 / 9
या मिश्रणात १ ते दिड चमचा मधसुद्धा टाका. मधामुळे केसांवर चमक येते आणि केसांना पोषण मिळते.
8 / 9
हे सगळे पदार्थ आता व्यवस्थित हलवून एकजीव करून घ्या. त्यानंतर केसांचा गुंता काढू टाका आणि केसांच्या मुळाशी तसेच केसांच्या लांबीवर हा हेअरमास्क लावा. अर्ध्या ते पाऊण तासांनी केस धुवून टाका.
9 / 9
हा उपाय आठवड्यातून दोन वेळा नियमितपणे केल्यास काही दिवसांतच केसांवर खूप चांगला परिणाम दिसून येईल.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHair Care Tipsकेसांची काळजीHome remedyहोम रेमेडी