शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'मिलेगा ना सचिवजी' म्हणणारी पंचायतमधली ‘आजी’, आयुष्यभर झगडली आणि वयाच्या ७५ व्या वर्षी आता..

By भाग्यश्री कांबळे | Published: June 19, 2024 3:15 PM

1 / 10
भाग्यश्री कांबळे : मेहनत करत रहा, फळ नक्कीच मिळेल, आणि हे फळ कोणत्याही वयात मिळू शकते (Abha Sharma). स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाची मर्यादा नसते. फक्त जिद्द आणि, स्वप्न करण्याप्रती ध्येय असायला हवे (Panchayat). अशाच एका व्यक्तीला वयाच्या ७५ व्या वर्षी यश मिळालं आहे (Inspirational Story). पंचायत ३ मधील व्यक्तिरेखा सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ज्यात अम्माजीचं तोंड भरून कौतुक होत आहे. आभा शर्मा असं अभिनेत्रीचं नाव असून, लहानपणापासून अभिनेत्री होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या आभाचं करिअर क्षेत्रात घडणारे चढ - उतार हे प्रेरणादायी ठरत आहे(As ‘Ammaji’ In ‘Panchayat’, 75-YO Abha Sharma Shows That Dreams Don’t Have an Age Limit).
2 / 10
ज्या वयात आपण रिटायरमेन्टचं प्लॅन ठरवतो, त्या वयात कोणाचं स्वप्न पूर्ण झालेलं पाहून, आपल्याला नक्कीच आनंद होईल. एका ५४ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या महिलेनं अभिनयात क्षेत्रात काम करून स्वप्न पूर्ण केलं आहे. तिचा अभिनय क्षेत्रातलं प्रवास हा संघर्षमय होता. अनेक अडचणींना मात करीत उतार वयात आपलं स्वप्न त्या जगत आहेत.
3 / 10
आभा शर्मा यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत आपल्या लाईफ स्ट्रगलबाबत काही किस्से शेअर केले आहेत. ते म्हणतात, लहानपणापासून अभिनेत्री होण्याचं स्वप्न होतं. पण आईचा विरोध होता. माझ्या कुटुंबातील लोक सुशिक्षित असले तरी ते थोडे परंपरावादी होते.
4 / 10
आईचे निधन झाल्यानंतर अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात झाली. यात बहिण भावांनी खूप मदत केली असल्याचं ते सांगतात.
5 / 10
वडिलांच्या निधनानंतर घरची सर्व जबाबदारी आभाच्या खांद्यावर पडली. या कारणामुळे त्यांनी लग्न केले नाही. वयाच्या ३५ व्या वर्षी हिरड्यांमध्ये संसर्ग झाला होता. त्यामुळे सगळे दात पडले असल्याचं ते सांगतात. असे असूनही त्यांनी जिद्द सोडली नाही.
6 / 10
कलाकार होण्याचं स्वप्न त्यांनी सोडलं नाही. त्यांनी जे जे स्कूल ऑफ आर्ट्समधून डिप्लोमाची पदवी घेतली, आणि १९८९ साली शिक्षिका झाल्या. पण वयाच्या ४५ व्या वर्षी आजारपणामुळे त्यांचे हातपाय थरथरू लागले.
7 / 10
आयुष्य दिवसेंदिवस कठीण होत असूनही, आभाने कधीही निराशेला तिच्यावर वर्चस्व गाजवू दिले नाही, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी अभिनेत्री बनण्याचे स्वप्न कधीच विसरले नाही. मग एके दिवशी १९९१ मध्ये त्यांनी शिक्षिकेची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.
8 / 10
२००८ साली, लखनौमध्ये त्यांनी रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली. २००९ साली आभाने बँक ऑफ बरोडाच्या जाहिरातीसाठी ऑडिशन दिले. पहिल्याच ऑडिशनमध्ये त्यांना यश मिळाले. त्यानंतर त्यांना मुंबईत जाहिरात शूट करण्याची संधी मिळाली. परिणीती चोप्रा आणि अर्जुन कपूरसोबत इश्कजादेमध्ये काम करण्याची संधी मिळाली असल्याचे आभा शर्मा सांगतात.
9 / 10
यानंतर आभाचे काही रंगभूमीतील सहकारी, अनुराग शुक्ला शिवा यांनी त्यांना कोविडनंतर पंचायतीसाठी ऑडिशन टेप रेकॉर्ड करण्यास सांगितले. यामुळे त्यांना पंचायत वेब सिरीजमध्ये अम्माजींची भूमिका मिळाली. त्या सांगतात, त्यावेळी त्यांना वेब सिरीजचा अर्थही माहित नव्हता. पण पंचायत सेटवर पोहोचल्यानंतर त्या या मालिकेबद्दल खूप उत्सुक झाल्या होत्या.
10 / 10
वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या आभा म्हणतात, 'जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची आवड असेल, तर प्रयत्न करा आणि कधीही आशा सोडू नका.'
टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीSocial Viralसोशल व्हायरल