1 / 9काळ्या साड्यांचा थाट काही वेगळाच असतो. बऱ्याच जणी तो रंग घेणं टाळतात पण काळी साडी खरंच अंगावर खूप शोभून दिसते. संक्रांतीसाठी तर बहुतांश जणी आवर्जून काळ्या साड्यांची खरेदी करतात. आता तुम्हालाही संक्रांतीच्या निमित्ताने काळी साडी घ्यायची असेल तर काळ्या साड्यांचे हे काही सुंदर प्रकार एकदा पाहून घ्या..2 / 9पैठणीचा तर मानच वेगळा असतो आणि त्यात काळी चंद्रकळा तर खूपच भाव खाऊन जाते. प्युअर सिल्क घेणं नाहीच जमलं तर सेमी सिल्कमधली एखादी चंद्रकळा पैठणी आपल्याकडे असावीच..3 / 9काळ्या रंगाची नारायण पेठ साडीही खूप छान दिसते. काळ्या साडीला लाल, निळे, हिरवे, केशरी या रंगांचे काठ असतील तर ती आणखी शोभून दिसते.4 / 9खण साडी तर अजूनही ट्रेण्डिंग असून तिची लोकप्रियता कायम आहे. संक्रांतीनिमित्त तुम्हाला स्वस्तात मस्त साडी घ्यायची असेल तर खण साडीचा विचार नक्कीच करू शकता.5 / 9खण साडीमधला थोडा आणखी महाग आणि रिच लूक देणारा प्रकार म्हणजे इरकल साडी. यामध्ये कॉटन इरकल आणि सिल्क इरकल हे दोन्ही प्रकार मिळतात. त्या दोन्ही साड्या अंगावर अतिशय सुंदर दिसतात. या साड्यांवर तुम्ही थोड्या वेगळ्या प्रकारचे दागिने घातले तर नक्कीच ट्रेंडी दिसता. 6 / 9हल्ली काळ्या रंगाची पैठणी घेण्यासोबतच काळ्या रंगाची बनारसीही अनेकींना भुरळ घालत आहेत. ऑनलाईन शॉपिंग साईटवरून तर काळ्या रंगाच्या बनारसी साड्या बऱ्याच कमी किमतीत मिळतात. 7 / 9 प्युअर सिल्क प्रकारातली काळी साडी घ्यायची असेल तर प्युअर सिल्क गढवाल हा एक चांगला पर्याय असू शकतो. 8 / 9सध्या ट्रेडिंग असणारी ऑर्गेंझा साडीही तुम्ही संक्रांतीला घेऊ शकता. ऑर्गेंझा साडीतही कित्येक नवनविन प्रकार आणि डिझाईन्स मिळत आहेत.9 / 9काळ्या रंगाची सेक्विन साडी पार्टी, रिसेप्शन अशा कार्यक्रमांमध्ये घालायला खूप छान आहेत.