Beautiful Peacock Rangoli Design, check out 7 trendy design
छापा - ठिपके सोडा, अगदी १० मिनिटांत काढा मोराची सुंदर - आकर्षक रांगोळी डिझाईन By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2024 12:14 PM1 / 10दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे (Diwali 2024). साफसफाई केल्यानंतर अनेकांची फराळ करण्याची लगबग सुरु आहे (Diwali Faral). दिवाळी सुरु होताच, रोषणाई आणि दिव्यांनी घर उजळून निघते (Festival of Lights). पण दिवाळी रांगोळीशिवाय (Rangoli) दिवाळी आहा सण अपूर्ण आहे. दिवाळीचे ६ दिवस नक्की कोणत्या डिझाईनचे रांगोळी काढावे हे सुचत नाही(Beautiful Peacock Rangoli Design, check out 7 trendy design).2 / 10पूर्वी लोक ठिपक्यांची रांगोळी काढत असत. परंतु, जस जसा काळ बदलत गेला, तस तसं रांगोळीमध्येही बदल घडत गेले. छाप्याव्यतिरिक्त डिझाईनर रांगोळ्या काढण्यात येतात. 3 / 10ज्यात मोराची रांगोळीही तितकीच फेमस आहे. मोरांच्या डिझाईनची रांगोळी महिलावर्ग दारासमोर आवर्जून काढतात. जर यंदाच्या दिवाळीला आपल्याला हटके आणि युनिक रांगोळी डिझाईन काढायची असेल तर, मोराची रांगोळी डिझाईन आवश्य काढा. 4 / 10मोर फक्त पैठणीच्या पदरावर नसून, रांगोळीच्या डिझाईनमध्येही शोभून दिसते. जर आपल्याला आकर्षक रांगोळी काढायची असेल तर, त्यात सुंदर रंगही भरा. 5 / 10फांद्यावर बसलेला या मोराची रांगोळी डिझाईन दिसायला सुंदर आहे. 6 / 10आपण सर्वात आधी पट्टी रांगोळी डिझाईन काढून, त्यावर मोराची डिझाईन काढू शकता. 7 / 10जर आपल्याला युनिक आणि मोठी रांगोळी डिझाईन काढायची असेल तर, सर्वात आधी, गोलाकारभोवती लहान डिझाईन काढा. मध्यभागी दिवाळीच्या शुभेच्छा लिहा. नंतर मोराची डिझाईन काढा. 8 / 10आपण आधी दिवा काढून, त्याच्याभोवतीने मोराची सुंदर रांगोळी डिझाईन काढू शकता. शिवाय लहान फुलंही काढू शकता. त्याच्या जवळ दिवे लावा. रांगोळी आकर्षक दिसेल. 9 / 10हँगर आणि बांगड्याच्या मदतीनेही मोराच्या डिझाईनची सुंदर आणि डोळे दिपवणारी रांगोळी काढता येऊ शकते. 10 / 10जर रांगोळी आपल्यालाकडे उपलब्ध नसेल तर, आपण फुलांचा वापर करूनही सुंदर मोराची रांगोळी डिझाईन काढू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications