शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Style With Gajra: गजरा लावायचा पण लूक टिपिकल नको? बघा गजरा माळण्याच्या १० आयडिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2022 6:27 PM

1 / 10
१. गजरा लावायला आवडतो, पण गजरा लावला की आपण अगदीच टिपिकल दिसू असं वाटू लागतं.. म्हणून मग नकोच तो गजरा.. असं म्हणून काही जणी गजरा लावणंच सोडून देतात. म्हणूनच तर या बघा गजरा माळण्याच्या काही खास स्टाईल...
2 / 10
२. साडी नेसली किंवा एखादी पारंपरिक वेशुभुषा केली की गजरा माळावाच वाटतो. गजऱ्याशिवाय सारा श्रृंगार अपूर्ण वाटायला लागतो.. म्हणूनच तर असा विद्या बालनसारखा स्टायलिश गजरा कधी कधी माळायला काहीच हरकत नाही..
3 / 10
३. आलिया भटचा हा गजरा लूकही एकदम सिंपल आणि क्यूट आहे.. खूप जास्त फूलं नको असतील, तर आलिया सारखा हा गळ्यांचा गजरा लावू शकता..
4 / 10
४. वेस्टर्न ड्रेसवर गजरा किंवा फुलं माळायची असतील, तर ती उत्तम पद्धतीने कशी माळावीत, याचं उत्तम उदाहरण म्हणजे करिना कपूरची ही स्टाईल. अशा पद्धतीने गजरा माळणं खरोखरंच कॅची लूक देईल.
5 / 10
५. क्रिती सेनन हिने केलेली ही Style With Gajra म्हणजे जस्ट वॉव... एवढी मॉडर्न स्टाईल करूनही तेवढ्याच नजाकतीने गजरा माळता येतो, हेच तिच्या या फोटोतून दिसतं.
6 / 10
६. गजरा लावण्याच्या या स्टाईलला साऊथ इंडियन स्टाईल म्हटलं जातं. केस बऱ्यापैकी मोकळे सोडूनही गजरा माळण्याची हौस भागवायची असेल, तर अशा पद्धतीने गजरा लावा, लूक एकदम चेंज..
7 / 10
७. Style With Gajra या प्रकारातला अभिनेत्री क्रिती सेनन हिचा हा आणखी एक खास लूक. अशा पद्धतीने मेकअप आणि गजरा असेल तर कुणी आपल्याला टिपिकल म्हणण्याचा विचारही करू शकणार नाही..
8 / 10
८. फॅशनिस्टा सोनम कपूर हिची प्रत्येक गोष्टच खास असते. म्हणूनच तर आता तिने ज्या पद्धतीने गजरा लावला आहे, तो ही एकदा बघाच... एखाद्या पार्टीसाठी अशी स्टाईल राखून ठेवा.. खूपच स्पेशल दिसाल.
9 / 10
९. Style With Gajra करण्यात Sonakshi Sinha ही मागे नाही.. तिनेही अतिशय उत्तम पद्धतीने गजरा आणि वेशभुषा यांचं कॉम्बिनेशन सांभाळलं आहे.
10 / 10
१०. अभिनेत्री सई पल्लवी हिचा हा गजरा लूक पुर्णपणे वेगळा आहे. तिच्या या एथनिक लूकला गजऱ्याने पुर्णत्व दिले आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सMakeup Tipsमेकअप टिप्स