benefits of navel oiling, which oil is best for navel oiling? importance of navel oiling
फक्त ४ थेंब तेलाची बघा जादू- रोज रात्री ‘हे’ काम करा, आरोग्याच्या तक्रारीच गायब By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2024 2:08 PM1 / 9मासिक पाळीतलं दुखणं, वारंवार होणारा सर्दी- खोकला, डोकेदुखी, रोगप्रतिकारक शक्ती कमी असणं, अपचन आणि पोटाचे वेगवेगळे त्रास अशा आरोग्याच्या कित्येक समस्या कमी करण्यासाठी तेलाचा एका खास पद्धतीने केलेला वापर अतिशय उपयुक्त ठरतो. तो नेमका कसा करायचा ते पाहा2 / 9आयुर्वेदिक डॉक्टर सांगतात की दररोज रात्री झोपण्यापुर्वी बेंबीमध्ये काही थेंब तेल टाकलं तर त्याचा आरोग्याला खूप चांगला फायदा होतो. याविषयीचा एक व्हिडिओ त्यांनी dietitian_manpreet या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. आरोग्याच्या कोणत्या समस्या कमी करण्यासाठी कोणतं तेल बेंबीमध्ये टाकावं ते पाहा.. हे उपाय करण्यासाठी ३ ते ४ थेंब तेल घेऊन ते बेंबीमध्ये सोडावं आणि बोटाने हलक्या हाताने काही सेकंदांसाठी गोलाकार मसाज करावा.3 / 9पचनाच्या संबंधी तक्रारी असतील तर त्यासाठी बेंबीमध्ये तिळाचं तेल सोडावं. त्यामुळे पचन चांगले होण्यास मदत होईल. हा उपाय केल्याने सांधेदुखीचा त्रासदेखील कमी होतो.4 / 9पाळी नियमित नसेल तर कॅस्टर ऑईल वापरा.5 / 9नेहमीच खूप ताण येत असेल, मन एकाजागी स्थिर होत नसेल, अस्वस्थ वाटत असेल तर शुद्ध तूपाचे काही थेंब बेंबीमध्ये टाका.6 / 9गर्भाशयाशी संबंधित कोणत्याही तक्रारी असतील तर बेंबीमध्ये नारळाचं तेल लावावं. नारळाचं तेल बेंबीमध्ये टाकल्यास रात्री चांगली झोप येते. ज्यांना रात्री लवकर झोप येत नाही, वारंवार जाग येऊन झोप अपुरी होते, त्यांनी हा उपाय करावा....7 / 9बेंबीमध्ये कडुलिंबाचं तेल सोडल्याने चेहऱ्यावर छान चकाकी येते. पिंपल्स, ॲक्ने असा त्रास खूप कमी होतो.8 / 9केसांच्या बाबतीत कोणत्याही समस्या असतील तर बेंबीमध्ये रोजमेरी तेल सोडा. यामुळे केसांची वाढदेखील चांगली होते.9 / 9चेहऱ्यावरचे पिगमेंटेशन कमी करण्यासाठी बदाम तेलाचाही उपयोग होतो. आणखी वाचा Subscribe to Notifications