शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कापूर- तूप एकत्र करा आणि बघा जादू, पिंपल्सपासून ते डोकेदुखीपर्यंत अनेक समस्या गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2024 5:00 PM

1 / 9
तूप हे किती आरोग्यदायी आहे हे तर आपण सगळेच जाणतो. त्यामुळे आपल्या आहारात तूप असणं अतिशय गरजेचं आहे. पण सौंदर्य वाढविण्यापासून ते अनेक आजारांना पळवून लावण्यापर्यंत तूप अनेक गोष्टींसाठी उपयुक्त ठरतं.
2 / 9
तुपाला जेव्हा कापूराची साथ मिळते तेव्हा तूप आणि कापूर ही जोडगोळी खरोखरच कमालीची उपयोगी ठरते. बघा तूप आणि कापूराचा एकत्र वापर केल्याने किती वेगवेगळे लाभ होतात...
3 / 9
जर रात्री शांत झोप येत नसेल तर कापूर आणि तुपाचा एकत्रित दिवा तुमच्या बेडरुममध्ये लावा. कापुराच्या सुवासामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो आणि त्यामुळे चांगली शांत झोप लागण्यास मदत होते.
4 / 9
कापूर आणि तुपाचा दिवा लावल्याने वातावरण शुद्धी होते आणि घरातले डास, किटक दूर जातात.
5 / 9
सायनसचा त्रास होत असेल तर कापूर आणि तूप एकत्र करून त्या मिश्रणाचा सुगंध घ्या. नाक- डोकं मोकळं होण्यास मदत होईल किंवा मग कापूराची पावडर तुपात टाका आणि त्याने डोक्याला मसाज करा.
6 / 9
मार लागल्यामुळे सूज आली असेल तर त्याजागी कापूर आणि तुपाचं मिश्रण लावा आणि त्यावर एक कापडी पट्टी गुंडाळा. काही तासांतच सूज उतरेल.
7 / 9
डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी कापूराची पावडर तुपामध्ये टाका आणि त्या मिश्रणाने डोक्याला मालिश करा.
8 / 9
कापूर आणि तूप एकत्र करून पिंपल्स आलेल्या ठिकाणी आणि त्याच्या आजुबाजुला लावा. पिंपल्सचा त्रास कमी होईल.
9 / 9
पायांना पडलेल्या भेगा कमी करण्यासाठीही कापूर आणि तुपाचे मिश्रण अतिशय उपयुक्त ठरते.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सHome remedyहोम रेमेडी