शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पाय धुतल्यानंतर तुमच्या शरीरावर होतो 'हा' परिणाम, बाहेरून आल्याआल्या लगेच पाय धुवा कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2024 2:05 PM

1 / 7
दिवसभर आपण घराबाहेर काम करतो. त्यानंतर दमून घरी येतो. घरी आल्यानंतर बऱ्याच जणांना हात- पाय धुऊन फ्रेश होण्याची सवय असते.(benefits of washing your feet after returning home)
2 / 7
अशी सवय तुम्हालाही असेल तर ते खूपच उत्तम. कारण आयुर्वेदानुसार तर दरवेळी बाहेरून घरी आल्यानंतर पाय धुणं गरजेचं आहे. (why it is important to wash feet after coming home?)
3 / 7
यामुळे पायांवर साचलेली धूळ, मळ, जंतू निघून जातो. हा एक तर फायदा आहेच. पण त्यासोबतच तुमच्या आरोग्याच्या इतरही तक्रारी पाय स्वच्छ धुण्याच्या सवयीमुळे दूर होऊ शकतात. त्या कोणत्या ते बघा..
4 / 7
dr.manisha.mishra या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलेल्या माहितीनुसार आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात की बाहेरून आल्यानंतर पाय धुतले की तुमचा थकवा बऱ्याच प्रमाणात कमी होतो.
5 / 7
पाय धुण्याच्या सवयीमुळे डोळ्यांचे आरोग्यही चांगले राहण्यास मदत होते.
6 / 7
आयुर्वेदानुसार बाहेरून आल्यानंतर पाय धुण्याची सवय असलेल्या व्यक्तींची आकलन क्षमता, स्मरणशक्ती चांगली असते.
7 / 7
त्यामुळे बाहेरून आल्यानंतर पाय धुण्याची सवय स्वतःला लावून घ्या आणि मुलांनाही शिकवा. अगदी तासाभरासाठीही तुम्ही बाहेर गेला असाल तरीही घरी आल्यावर सगळ्यात आधी पाय धुवा..
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सAyurvedic Home Remediesघरगुती उपायeye care tipsडोळ्यांची निगा