शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Best Gift ideas for valentine week : व्हॅलेंटाईन्स वीकमध्ये पार्टनरला द्या स्वस्तात मस्त गिफ्ट; 500 रूपयांत गिफ्ट करता येतील या वस्तू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2022 3:25 PM

1 / 12
दरवर्षी ७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन्स (valentine week 2022) वीकची सुरूवात होते. सगळ्यात पहिला दिवस असतचो तो म्हणजे रोज डे. (Rose Day) यादिवशी आपल्या प्रेयसीला किंवा पार्टनरला आवडत्या रंगाचं गुलाबाचं फूल देऊन भावना व्यक्त केल्या जातात. (Best valentine gift for boyfriend) अनेकांना आपल्या पार्टनरला गिफ्ट द्यायची खूप इच्छा असते पण बजेट कमी असल्यामुळे किंवा नक्की काय गिफ्ट द्यायचं हे कळत नसल्यानं अनेकजण पार्टनरला गिफ्ट देणं टाळतात. (10 unique Valentine's gifts) गिफ्टपेक्षा नाही गिफ्ट देण्यामागची भावना फार महत्वाची असते. म्हणून तुम्हाला पटकट उपलब्ध होतील असे काही काही गिफ्ट ऑपश्न्स सांगणार आहोत. (valentine week 2022 best valentine gift for girlfriend)
2 / 12
आजकाल सगळ्यांमध्येच स्मार्ट वॉचचा खूप क्रेझ आहे. प्रत्येकालाच आपल्या मनगटावर छानसं स्मार्ट वॉच असावं असं वाटतं. तुम्ही तुमच्या पार्टनरला व्हेटेंनटाईन वीकमध्ये कोणत्याही दिवशी असं घड्याळ देऊन सेलिब्रेशन करू शकता. साधारपण ५०० ते ५००० हजार रूपयांपर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या कंपनीचे स्मार्टवॉच उपलब्ध होतील. नॉईस, रिअल मी, अॅमेझफीट, बोट या कंपन्यांचे स्मार्ट वॉच बरेच लोक सध्या वापरत आहेत.
3 / 12
तिला किंवा त्याला ज्वलेरी गिफ्ट करणं हा प्रेम व्यक्त करण्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो. फिंगर रिंग, चेन, ब्रेसलेट, तुम्ही आपल्या पार्टनरला देऊ शकता. सध्या ऑनलाईन साईट्सवरही छान छान ज्वेलरी ऑपश्न्स असतात. जर तुम्हाला बाजारात किंवा दुकानात जाऊन तिच्यासाठी किंवा त्याच्यासाठी काही घेण्याचा कंटाळा येत असेल तर घरबसल्या तुम्ही गिफ्ट मागवू शकता. ५० रूपयांपासून हजार ते २०० हजार रूपयांपर्यंत तुम्हाला ज्वेलरीचे एकापेक्षा एक पर्याय सापडतील.
4 / 12
प्रत्येकजण पर्स, वॉलेट वापरतोच. तुम्ही दिलेली वस्तू पार्टनरच्या रोजच्या वापरात असावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही वॉलेट गिफ्ट करू शकता. आजकाल पर्सनलाईज वॉलेट्सही खूप मिळतात. तुम्हाला हवं असेल तर पार्टनरचा फोटो त्या वॉलेटवर प्रिंट करून देऊ शकता. २०० रूपयांपासून ५०० रूपयांपर्यंत छान छान वॉलेट्स ऑनलाईन तसंच बाजारातही उपलब्ध होतील.
5 / 12
आजकाल मुलांप्रमाणे मुलींचेही छान छान ट्रक सुट, जमसुट ऑनलाईन साईटवर विक्रिस आहेत. व्यायामापासून प्रवासापर्यंत मुलांना आरामदायक कपडे घालायला आवडतात. तुम्ही पार्टनरच्या आवडत्या रंगाचा किंवा त्याला सुट होईल असा ट्रक सुट गिफ्ट करू शकता.
6 / 12
अनेक मुलं विसरभोळी असतात. आपल्या रोजच्या लागणाऱ्या वस्तू विसरू नये यासाठी तुम्ही त्याला किंवा तिला साईड बॅग गिफ्ट करू शकता. ज्यामध्ये आपला फोन, चार्जर, रुमाल, मास्क, व्हिजिटिंग कार्ड इत्यादी सहज ठेवता येऊ शकतं.
7 / 12
तुम्ही तुमच्या पार्टनरला कॉफी मग देऊ शकता. यावर तुम्ही कोट्स किंवा फोटो बनवूनही देऊ शकता. याशिवाय मॅजिक कॉफी मग देखील आजकाल खूप लोकप्रिय आहे. मॅजिक कॉफी मगमध्ये, तुम्ही तुमच्या आवडीचे फोटो टाकू शकता, जे गरम पेय ओतल्यानंतरच दिसते. हा देखील एक चांगला पर्याय असू शकतो.
8 / 12
व्हॅलेंटाईन डे गिफ्टसाठी मोबाईल फोन कव्हर हा एक चांगला पर्याय असू शकतो. तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडला त्याच्या व्यक्तिमत्त्वानुसार चांगले मोबाईल कव्हर देऊ शकता. याशिवाय, तुम्ही तुमच्या मित्राला कस्टमाइज करून मोबाईल फोन कव्हर देखील देऊ शकता.
9 / 12
व्हॅलेंटाईन डेच्या भेटवस्तूंच्या यादीत इअरफोन्सही समाविष्ट आहेत. आजकाल विविध प्रकारचे रंगीबेरंगी इअरफोन्सही बाजारात उपलब्ध आहेत, त्यामुळे तुम्ही तुमच्या प्रियकराला त्याच्या आवडीचे इअरफोन व्हॅलेंटाइन गिफ्ट म्हणून देऊ शकता
10 / 12
या रोमँटिक लव्ह कार्ड्समध्ये दिलेल्या संदेशांद्वारे तुम्ही तुमच्या जोडीदारावरचं प्रकारचे प्रेम संदेश पाठवू शकता. या मेसेज कार्ड्सच्या सहाय्याने तुम्ही त्यांना तुमच्या जीवनातील त्यांच्या स्थानाचे महत्त्व पटवून देऊ शकता. तुम्ही त्यांना व्हॅलेंटाईन डे वर वेगवेगळ्या वेळी छोट्या भेटवस्तू देखील देऊ शकता. १०० रूपयांपासून ५०० रूपयांपर्यंत तुम्हाला नवनवीन लव्ह कार्ड्स उपलब्ध होतील.
11 / 12
सनग्लासेस ही अशी गोष्ट आहे जी घेण्यास क्वचितच कोणीही नकार देईल. तुमच्या जोडीदाराकडे सनग्लासेस असले तरी त्यांच्या स्टाईल लिस्टमध्ये आणखी एक सनग्लासेस जोडण्यापेक्षा चांगले काय असू शकते. आजकाल सनग्लासेसच्या नवनवीन डिझाईन्स बाजारात आणि ऑनलाइन उपलब्ध आहेत. तुम्ही पार्टनरला त्यांच्या आवडीचे सनग्लासेस गिफ्ट करू शकता.
12 / 12
कपल टी-शर्टची क्रेझ खूप दिवसांपासून सुरू आहे. ज्याला आपण एव्हरग्रीन क्रेझ आणि फॅशन दोन्ही म्हणू शकतो. या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने तुम्ही या कपलचा टी-शर्ट तुमच्या पतीला भेट म्हणून देऊ शकता. जे दोघेही फिरायला, जेवायला किंवा बाजारात जातानाही घालू शकतात. (Image Credit- amazone)
टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेValentine Weekव्हॅलेंटाईन वीकShoppingखरेदीGift Ideasगिफ्ट आयडिया