शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

इंचभर केस वाढायला महिनोंमहिने लागतात? २ पदार्थांचा जादुई उपाय करून पाहा- केस भराभर वाढतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2024 4:46 PM

1 / 7
केसांची वाढ खुंटली असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा. हा उपाय करण्यासाठी आपल्याला स्वयंपाक घरातील फक्त २ पदार्थ वापरायचे आहेत.
2 / 7
यापैकी पहिला पदार्थ आहे लवंग. हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी एका पातेल्यात साधारण १ ग्लास पाणी गरम करायला ठेवा. त्या पाण्यामध्ये १ टेबलस्पून लवंग टाका. लवंगमध्ये असणाऱ्या ॲण्टी बॅक्टेरियल, ॲण्टीफंगल घटकांमुळे केसांमधला कोंडा कमी होतो. तसेच त्वचेच्या खालच्या भागातील रक्ताभिसरण सुरळीत होऊन केसांची मुळं पक्की होण्यास मदत होते.
3 / 7
त्यानंतर त्याच पाण्यामध्ये २ टेबलस्पून मेथी दाणे टाका आणि हे पाणी १० ते १५ मिनिटे मध्यम आचेवर उकळून घ्या. मेथी दाणे केसांसाठी नॅचरल कंडिशनर म्हणून काम करतात. तसेच केसांच्या वाढीसाठी पोषक ठरतात. केसांना मऊ, सिल्की बनवतात.
4 / 7
पाणी थंड झालं की एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. ही बाटली तुम्ही फ्रिजमध्ये ठेवल्यास हे पाणी २ आठवडे तरी चांगलं राहील.
5 / 7
यानंतर दररोज रात्री झोपण्यापुर्वी ते पाणी केसांच्या मुळांशी स्प्रे करा. सगळीकडे स्काल्पला ते व्यवस्थित लागेल याची काळजी घ्या. त्यानंतर हलक्या हाताने केसांच्या मुळाशी मसाज करा. यानंतर केस बांधायचे असतील तर ते पुर्णपणे वाळू द्या आणि नंतर बांधा.
6 / 7
हे पाणी केसांना लावल्यानंतर लगेचच केस धुण्याची गरज नाही. तुम्ही दररोज रात्री हे पाणी केसांना लावा आणि आठवड्यातून दोन वेळा नेहमीप्रमाणे केस धुवा.
7 / 7
हा उपाय दररोज नियमितपणे केल्यास काही दिवसांतच केसांची खूप छान आणि वेगात वाढ झालेली दिसून येईल, असं haircarewithsomya या इन्स्टाग्राम पेजवर सुचविण्यात आलं आहे.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHair Care Tipsकेसांची काळजीHome remedyहोम रेमेडी