best home remedies for headache, how to stop headache, quick and easy solution for headache
डोकं खूप ठणकतंय? चिमूटभर मीठ घेऊन 'हा' सोपा उपाय करा, डोकेदुखी काही सेकंदातच गायब By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2024 3:24 PM1 / 6आज डोकं खूप दुखतंय हे वाक्य आपण सतत कोणाकडून तरी ऐकत असतो. किंवा आपण तरी म्हणत असतो. कारण डोकेदुखीचा त्रास खूप लोकांना सतत होतो.2 / 6 डोके दुखण्याचं प्रमाण तर महिलांमध्ये जरा जास्तच आहे. ॲसिडिटी, जेवणाच्या वेळा नियमित नसणे, कर्कश्श आवाज अशी अनेक कारणं त्यामागे आहेतच. त्यामुळे पुरुषांच्या तुलनेत महिलांना डोकेदुखीचा त्रास जरा जास्तच होतो. (how to stop headache?)3 / 6म्हणूनच प्रत्येकवेळी डोकं दुखत असेल तर त्यासाठी लगेच कोणती गोळी किंवा औषधं घेण्यापेक्षा हा एक अतिशय सोपा घरगुती उपाय आधी करून पाहा... (best home remedies for headache)4 / 6डोकेदुखीसाठी कोणता घरगुती उपाय करावा, याविषयीची माहिती mahila_swasthya_foundation या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. (quick and easy solution for headache)5 / 6यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की डोकं दुखायला लागल्यावर एक चिमूटभर मीठ जिभेवर ठेवा. त्यानंतर ३० सेकंद डोळे मिटून शांत बसा.6 / 6त्यानंतर १ ग्लासभर पाणी प्या. हा उपाय केल्यानंतर पुढच्या काही सेकंदातच तुमची डोकेदुखी खूप जास्त कमी झालेली जाणवेल. हा उपाय केल्याने शरीरावर कोणताही दुष्परिणाम नक्कीच होणार नाही. त्यामुळे एकदा उपाय करून पाहायला हरकत नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications