शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मनी प्लांट वाढतच नाही? मातीत टाका 'ही' खास गोष्ट, मनी प्लांट वाढेल भराभर- कधीच सुकणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2024 4:11 PM

1 / 6
बरेच जण अगदी हौशीने आपल्या घरात, अंगणात, बाल्कनीमध्ये मनी प्लांट लावतात. पण बऱ्याचदा असं होतं की मनी प्लांटची चांगली वाढ होतच नाही.(best home remedies for the fast growth of money plant)
2 / 6
मनी प्लांट सुकत जातो किंवा मग त्याची पानं पिवळी पडत जातात. त्याची वाढ खुंटल्यासारखी होते. अशावेळी मग त्याची चांगली वाढ होण्यासाठी किंवा त्याला पुन्हा छान हिरवंगार करण्यासाठी काय उपाय करावा, तेच कळत नाही. (gardening tips for money plant)
3 / 6
म्हणूनच हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा.. तुमच्या घरातली टाकाऊ समजली जाणारी एक गोष्ट मनी प्लांटसाठी मात्र अतिशय उपयोगी ठरते आणि ती गोष्ट म्हणजे चहा पावडर.(home made fertilizer for money plant)
4 / 6
चहा केल्यानंतर जी चहा पावडर उरलेली असते ती उन्हामध्ये वाळवा आणि एका डब्यात भरा. या डब्यात रस पिळल्यानंतर उरलेली लिंबाची सालंही टाकून ठेवा.
5 / 6
ही चहा पावडर दर आठवड्यातून एकदा मनी प्लांटच्या झाडाच्या मातीमध्ये एकेक चमचा टाका. यामुळे मनी प्लांटची वाढ खूप जोमाने होईल.
6 / 6
याशिवाय पाम, गुलाब किंवा इतर शोभेच्या झाडांसाठीही हा उपाय करा. चहा पावडर हे त्यांच्यासाठी एक उत्तम खत ठरू शकते.
टॅग्स :Gardening Tipsबागकाम टिप्सTerrace Gardenगच्चीतली बाग