शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

काही केल्या डोक्यातला कोंडा कमी होत नाही? जावेद हबीब सांगतात १५ दिवसांत कोंडा घालविण्याचा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2024 12:52 PM

1 / 7
काही जणांच्या डोक्यात नेहमीच खूप कोंडा असतो. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असा कोणताही ऋतू असला तरी डोक्यातला कोंडा काही केल्या कमी होतच नाही.
2 / 7
डोक्यात खूप जास्त कोंडा असेल तर अगदी चारचौघांत केसांमधून हात फिरविण्याची किंवा भांग बदलून एखादी वेगळी हेअरस्टाईल करण्याचीही सोय नसते. कारण लगेच कोंडा सगळ्यांना दिसतो आणि खूप लाजिरवाणं वाटतं.
3 / 7
केसांत कोंडा असेल तर डोक्यातून कायम दुर्गंधी येते. शिवाय केस देखील गळतात. म्हणूनच डोक्यातला कोंडा कमी करण्यासाठी ब्यूटी एक्सपर्ट जावेद हबीब यांनी सांगितलेला हा एक खास उपाय करून पाहा. हा उपाय कसा करायचा याविषयीचा व्हिडिओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
4 / 7
डोक्यातला कोंडा कमी करण्यसाठी सॅव्हलॉन उपयोगी पडेल, असं ते सांगतात. ते तुम्हाला कोणत्याही औषधी दुकानात अगदी सहज मिळेल. एका वाटीमध्ये १ चमचा सॅव्हलॉन घ्या. त्यामध्ये ५ चमचे पाणी घ्या.
5 / 7
हे मिश्रण कापसाच्या बोळ्याच्या मदतीने केसांच्या मुळाशी लावा.
6 / 7
त्यानंतर १५ मिनिटांनी नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका.
7 / 7
हा उपाय आठवड्यातून एकदा करा. दोन आठवड्यातच केसांमधला कोंडा बऱ्यापैकी कमी झाल्याचे जाणवेल, असं जावेद हबीब सांगतात.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHair Care Tipsकेसांची काळजीHome remedyहोम रेमेडी