शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लग्नसराईमध्ये भिकबाळी घ्यायची? बघा १० ट्रेण्डी- आकर्षक पर्याय, एक से एक मस्त डिझाईन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2022 4:27 PM

1 / 10
१. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकाेन यांच्या प्रमुख भुमिका असणारा बाजीराव मस्तानी हा चित्रपट आला आणि त्यामध्ये रणवीर सिंगने घातलेल्या भिकबाळीने तरुण मुलांचे लक्ष वेधून घेतले.
2 / 10
२. या चित्रपटानंतर काळाच्या ओघात विसरला गेलेला हा पुरुषांचा पारंपरिक मराठमोळा दागिना पुन्हा प्रकाशझोतात आला आणि अनेक जणांनी कान टोचून घेतला. पुरुष उजव्या कानाच्या वरच्या बाजूला भिकबाळी घालतात.
3 / 10
३. लग्नसराई किंवा सणवार यानिमित्ताने महिलांचा जसा पारंपरिक वेशभुषा करण्याकडे कल असतो, तसाच ट्रेण्ड आता पुरुषांमध्येही आला आहे. अशावेळी पारंपरिक वेशभुषेतला एक कम्प्लिट लूक हवा असेल, तर कानात भिकबाळी असणं आवश्यकच आहे.
4 / 10
४. म्हणूनच यंदा लग्नसराईसाठी भिकबाळी घेण्याचा विचार असेल, तर त्यातले हे लेटेस्ट डिझाईन्स एकदा बघून घ्या.
5 / 10
५. या पारंपरिक दागिन्यांमध्ये आता अनेक नवनविन प्रकार आले आहेत.
6 / 10
६. रुद्राक्ष असणाऱ्या भिकबाळीला सध्या चांगली मागणी आहे. त्यामुळे मोत्यांऐवजी हे डिझाईनही निवडू शकता.
7 / 10
७. अशा पद्धतीच्या हेवी वर्क असणाऱ्या भिकबाळ्याही बाजारात पाहायला मिळतात. यंदाच्या लग्नसराईत खास नवरदेवाकरता अशा भिकबाळी घेतल्या जात आहेत.
8 / 10
८. कान टोचलेला नसेल तर अशा पद्धतीच्या चापेच्या भिकबाळीचे अनेक प्रकारही उपलब्ध आहेत.
9 / 10
९. पुर्वी भिकबाळीमध्ये फक्त मोती दिसायचे. पण आता मात्र असे गोल्डप्लेटेड मणीही भिकबाळीत वापरण्यात येतात.
10 / 10
१०. सोन्याची भिकबाळी घ्यायची नसेल तर लोकल मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन शॉपिंग साईटवर अगदी ३०- ४० रुपयांपासून भिकबाळी मिळतात.
टॅग्स :fashionफॅशनBeauty Tipsब्यूटी टिप्स