शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लग्नसराई स्पेशल : नव्या स्टाईलचे १० ब्लाऊज पॅटर्न्स; मागच्या गळ्याचे युनिक डिजाईन्स-देखणे आकर्षक रुप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 12:35 PM

1 / 10
लग्न असो किंवा हळदीचा कार्यक्रम किंवा साखरपुडा सगळ्यातला कॉमन फॅक्टर म्हणजे साडी खरेदी. सण उत्सवांना किंवा मोठ्या प्रसंगाना घराघरांतील महिला आवडीने साड्या घेतात. त्या साड्यांवर नेहमी कॉमन ब्लाऊज शिवण्यापेक्षा तुम्ही लेटेस्ट स्टाईल्सचे ब्लाऊज शिवू शकता. (Blouse Back Design Latest)
2 / 10
काकूबाई स्टाईलच्या ब्लाऊजमुळे कितीही नवीन पॅटर्नची साडी असेल तरीही तिचा लूक बिघडतो. (Simple blouse back design latest) साड्यांवर शोभून दिसेल असं ब्लाऊज शिवण्यासाठी मागच्या गळ्यांचे काही बेसिक पॅटर्न्स पाहूया हे पॅटर्न्स तुमचा लूक खुलवतील आणि दिसायलाही मस्त वाटेल.
3 / 10
तुम्हाला सिंपल इलिगंट लूक हवा असेल तर छोट्या लेस किंवा मण्यांचे वर्क केलेले ब्लाऊज तुम्ही निवडू शकता. स्लिव्हजलेस ब्लाऊजपेक्षा तुम्ही थ्री-फोर स्लिव्हजचे ब्लाऊज शिवले तर उठून दिसेल.
4 / 10
स्लिव्हजलेस साड्यांवर हे खड्यांचे पॅटर्न उठून दिसेल. पण जर तुमचे बॅक फॅट जास्त असेल तर गळा जास्त मोठा शिवू नका. पाठ स्लिम असेल तर तुम्ही या टाईपचे ब्लाऊज शिवू शकता.
5 / 10
लग्नासाठी किंवा मोठ्या कार्यक्रमासाठी तुम्ही हेवी वर्कचे ब्लाऊज शिवू शकता. यावर तुम्हाला हवातसा गळा शिवता येईल. फक्त असे ब्लाऊज धुताना विशेष काळजी घ्यावी लागते.
6 / 10
जर तुम्ही पार्टीला जात असाल किंवा घरातील काही छोटा कार्यक्रम असेल तर कोणत्याही डार्क रंगाच्या प्लेन साडीवर असे फूल स्लिव्हजचे ब्लाऊज शिवू शकता. तुम्हाला असे ब्लाऊज विकतसु्दधा अगदी सहज मिळेल.
7 / 10
मागच्या गळ्याचे हे पॅटर्न सिंपल साडीवरही उठून दिसेल याशिवाय पाठही सुंदर दिसेल. अशा पॅटर्नचा मागचा गळा असेल तर पुढच्या गळ्याला तुम्ही बोट नेक हे पॅटर्न शिवू शकता.
8 / 10
या पॅटर्नचे ब्लाऊज तुम्ही फॅन्सी साडीवर शिवू शकता. यामुळे सिंपल सुंदर लूक येईल आणि जास्त हेवी वर्कही वाटणार नाही.
9 / 10
(Image Credit -Social Media)
10 / 10
(Image Credit -Social Media)
टॅग्स :ShoppingखरेदीfashionफॅशनStyling Tipsस्टायलिंग टिप्स