शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

world breastfeeding week : आईला भरपूर दूध येण्यासाठी काय करावं? आहारतज्ज्ञ सांगतात ५ उपाय, करा आहारात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2024 5:05 PM

1 / 6
१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. तर भारतामध्ये ऑगस्ट महिना स्तनपान महिना म्हणून ओळखला जातो. स्तनपानाविषयी जनजागृती व्हावी, त्याविषयीचे गैरसमज दूर होऊन बाळांना पुरेसं पोषण मिळावं हा त्यामागचा उद्देश.
2 / 6
बऱ्याचदा आईला पुरेसं दूध येत नाही. त्यामुळे मग तिच्या बाळाचं पोट भरत नाही. अशावेळी बाळाला वरचं दूध द्यावं लागतं. हे टाळायचं असेल तर आईला भरपूर दूध येणं गरजेचं आहे. त्यासाठी काय उपाय करावे, आईने बाळाला पुरेल एवढं दूध येण्यासाठी कोणते पदार्थ आवर्जून खावे, याविषयीचा एक व्हिडिओ आहारतज्ज्ञांनी amitagadre या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.
3 / 6
यामध्ये आईचं दूध वाढण्यासाठी त्यांनी सांगितलेली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बाळाला दर ठराविक तासांनी जवळ घ्या आणि दूध पाजा. तुमच्या बाळाला तुम्ही जेवढं अधिक दूध पाजाल तेवढ्या प्रमाणात तुमचं शरीर आपोआप दूध तयार करेल.
4 / 6
शरीर चांगल्या प्रमाणात हायड्रेटेड ठेवा. बाळाला पाजण्यापुर्वी एक ते दोन ग्लास तुम्हाला शक्य असेल तेवढं पाणी प्या.
5 / 6
तुमच्या आहारात प्रोटीन्स आणि डाएटरी फायबर जास्त प्रमाणात असू द्या. नारळ, बदाम, वेगवेगळी धान्ये, हिरव्या पालेभाज्या जास्त प्रमाणात खा. यामुळेही आईचं दूध वाढण्यास मदत होते.
6 / 6
कोणताही ताण न घेता रिलॅक्स राहा. आराम करा. आईचं दूध वाढण्यासाठी आई आनंदी, समाधानी असणंही गरजेचं आहे. जर तुमच्या बाळाचं वजन योग्य प्रमाणात वाढत असेल. त्याची वयानुसार चांगली वाढ होत असेल तर तुमच्या बाळाला तुमचं दूध पुरत आहे, असं समजावं.
टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सfoodअन्नbreastfeedingजागतिक स्तनपान