Budget special sarees of finance minister Nirmala Sitaraman, Handloom sarees of Nirmala Sitaraman
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या 'बजेट स्पेशल' ६ सुपर साड्या, बघा साड्यांची खास बात.. By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2024 4:24 PM1 / 7अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर करायला यंदा कोणती साडी नेसली होती, याची चर्चा नेहमीच रंगते. कारण भारतीय हातामागावर क्षेत्रावर त्यांचं विशेष प्रेम असून या क्षेत्राला पुढे आणण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.2 / 7त्यानुसारच यावर्षी त्यांनी निळ्याशार टस्सर साडीची निवड केली. या साडीवर असलेलं कांथावर्क हे अतिशय प्राचीन विणकामापैकी एक मानलं जातं आणि ही कला प्रामुख्याने पुर्व भारतात पाहायला मिळते.3 / 7२०१९ साली बजेट सादर करताना निर्मला सीतारामन यांनी गुलाबी रंगाची मंगलगिरी साडी नेसली होती. ही साडी अतिशय तलम सुतापासून तयार केली जाते. आंध्रप्रदेशातल्या मंगलगिरी गावात या साड्यांची निर्मिती केली जाते. या साड्यांना जे नाजूक काठ असतात ते निजाम बाॅर्डर म्हणून ओळखले जातात. 4 / 7२०२० साली त्यांनी गोल्डन सिल्क साडी नेसली होती. सोनेरी रंगाच्या रेशीम किड्यापासून तयार झालेल्या रेशमाने ही साडी तयार केली जाते.5 / 7२०२१ साली अर्थमंत्र्यांनी लाल रंगाची इक्कत बाॅर्डर असणारी पोचमपल्ली साडी नेसली होती. तेलंगणामध्ये तयार होणाऱ्या या साडीवर टाय- डाय आणि विणकाम असं दोन्ही दिसून येतं. सिल्क, कॉटन आणि कॉटन- सिल्क ब्लेंड अशा तीन प्रकारात पोचमपल्ली साड्या मिळतात.6 / 7२०२२ मध्ये निर्मला सीतारामन यांनी नेसलेली साडी संबळपुरी होती. ही साडी ओडिशाच्या काही प्रांतात तयार केली जाते. ओडिशामध्ये तयार होणारी बोमकाई सिल्क साडी आणि संबळपुरी साडी यांच्यात खूप साम्य आहे.7 / 7मागच्यावर्षी म्हणजेच २०२३ ला निर्मला सीतारामन यांनी लाल रंगाची सिल्क इरकल साडी नेसली होती. धारवाडची ओळख असणाऱ्या या साडीचे काठ काळ्या रंगाचे होते आणि त्यावर सोनेरी रंगाने विणकाम केलेले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications