शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लग्नसराईत घालायलाच हवी टिपिकल मराठी बुगडी! बघा ८ सुंदर पॅटर्न- चारचौघीत उठून दिसाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2024 9:15 AM

1 / 8
लग्नसराईचे दिवस आता सुरू झाले आहेत. त्यानिमित्ताने टिपिकल महाराष्ट्रीयन लूक करायचा असेल तर कानात ठसकेबाज बुगडी असायलाच हवी. म्हणूनच बघा बुगड्यांचे हे काही सुंदर पॅटर्न्स..
2 / 8
मोती आणि स्टोन यांचे सुंदर कॉम्बिनेशन असणारी ही नाजुक बुगडी लहान मुलींनाही खूप सुंदर दिसेल.
3 / 8
थोडी ठसठशीत प्रकारची बुगडी आवडत असेल तर हे एक डिझाईन सुरेख आहे.
4 / 8
बुगडीचा हा एक नाजूक देखणा प्रकार. सगळ्याच वयोगटातील महिलांना ही बुगडी शोभून दिसणारी आहे.
5 / 8
ही बुगडी थोडी नव्या पद्धतीची आहे. ज्यांना कानाच्या वर आणि खाली अशा दोन्ही बाजुंनी दिसणारी बुगडी आवडत नाही, त्यांना या प्रकारची बुगडी आवडू शकते.
6 / 8
ऑक्सिडाईज प्रकारातल्याही अनेक सुंदर आकर्षक बुगडी बाजारात उपलब्ध आहेत. तुम्ही ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही त्या मागवू शकता.
7 / 8
नेहमीच्या त्याच त्या प्रकारच्या टिपिकल बुगडी आवडत नसतील, तर हा प्रकार तुम्हाला नक्कीच आवडू शकतो.
8 / 8
या बुगडीचं डिझाईन इतर बुगड्यांपेक्षा खूप वेगळं आहे. अशा प्रकारची बुगडी तुम्ही अगदी वेस्टर्न कपड्यांवरही घालू शकता.
टॅग्स :Shoppingखरेदीfashionफॅशनjewelleryदागिने