Buy Modern Mangalsutra Designs Pendant for Women
Diwali: मंगळसूत्राची आकर्षक पेंडंट, पाहा ७ डिझाइन्स-साडीसह ड्रेसवरही दिसतात शोभून-करा दिवाळीपाडवा स्पेशल खरेदी By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2024 3:52 PM1 / 10मंगळसूत्र म्हणजे सौभाग्याचं लेणं (Mangalsutra). विवाहित स्त्रियांचे मंगळसुत्राशी एक वेगळेच नाते असते (Married Women). महिलांच्या गळ्यात मंगळसूत्र कायम असते. पण जसं काळ बदलत गेला, मंगळसुत्राच्या डिझाईनमध्येही बदल होत गेले(Buy Modern Mangalsutra Designs Pendant for Women).2 / 10मंगळसुत्रामध्येही विविध प्रकारचे डिझाईन बाजारात उपलब्ध आहेत. ऑफिस, घरी किंवा फंक्शनमध्ये आपण विविध प्रकारचे मंगळसूत्र घालतो. काळ्या मण्यांच्या मंगळसुत्राची शोभा पेंडंटमुळे वाढते. 3 / 10जर आपल्याला हटके आणि आकर्षक डिझाईनचे मंगळसूत्र हवे असतील तर, या ७ प्रकारचे पेंडंट नक्कीच ट्राय करून पाहा. या ७ प्रकारचे स्टायलिश पेंडंट कोणत्याही लूकवर शोभून दिसतील. 4 / 10सध्या नाजूक मंगळसुत्राची क्रेज महिलांमध्ये आहे. जर आपल्याला डेली विअरसाठी मंगळसूत्र हवे असतील तर, फुलांची ही नाजूक पेंडंट डिझाईन ट्राय करा. 5 / 10मोर, मयूर कोणाला नाही आवडत. मार्केटमध्ये मोराच्या डिझाईनचे मंगळसूत्र खूप चर्चेत आहे. मोरपिसाच्या डिझाईनचे पेंडंट आपण ट्राय करून पाहू शकता. ऑफिस विअरवरही हे डिझाईन शोभून दिसतील.6 / 10उलट्या त्रिकोण आकाराचे पेंडंट तसे फार पूर्वीपासून महिलावर्ग वापरत आले आहेत. त्यात फुलांची डिझाईन आकर्षक वाटेल.7 / 10मंगळसूत्र पेंडंटवर रंगीबेरंगी खडे सुंदर वाटतात. या प्रकारचे पेंडंट साडी, ड्रेस किंवा वेस्टर्न विअरवर सुरेख दिसतात. 8 / 10मंगळसुत्राच्या वाट्या पेंडंटमध्येही बरेच ट्रेण्डी डिझाईन उपलब्ध आहेत. वाट्यांमध्ये रंगीबेरंगी खडे शोभून दिसतील.9 / 10जर आपल्याला रॉयल लूक हवा असेल तर, मोठ्या आकाराचे पेंडंट तयार करा. जे पारंपारिक भरगच्च डिझाईनर साड्यांवर शोभून दिसतील. 10 / 10हिरे आणि मोती जडित मंगळसुत्राच्या पेंडंटमुळे रिच आणि सोबर सिंपल लूक मिळतो. आणखी वाचा Subscribe to Notifications