शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कॅल्शियमचा खजिना आहेत तीळ, पण ते खाण्याची योग्य पद्धत माहिती आहे? पुरेपूर पोषण मिळण्यासाठी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2024 9:11 AM

1 / 6
हल्ली कमी वयातच पाठ, कंबर, गुडघे दुखू लागतात. त्यासाठी इतर अनेक घटकही जबाबदार आहेत. पण या दुखण्यामागचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे कॅल्शियमची कमतरता.
2 / 6
आता कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी अनेक जण कॅल्शियम सप्लिमेंट्स घेतात. पण आपल्या घरात पांढऱ्या तिळाच्या रुपात कॅल्शियमचा मोठा खजिना असताना विनाकारण कॅल्शियम सप्लिमेंट्स घेणं कितपत योग्य याचा विचार प्रत्येकानेच करावा...
3 / 6
तुमच्या शरीराला असणारी कॅल्शियमची गरज पांढऱ्या तिळाच्या माध्यमातून पुर्ण होऊ शकते. पण त्यासाठी ते तीळ नेमके कोणत्या पद्धतीने खायला पाहिजेत याविषयीची खास माहिती डॉक्टरांनी drirfan94 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
4 / 6
त्यामध्ये डॉक्टर सांगतात की पांढरे तीळ थोडेसे खमंग भाजून घ्या. त्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून त्याची पावडर करा.
5 / 6
एक ग्लास दुधामध्ये १ चमचा तिळाची पावडर टाकून दूध प्या. लहान मुलांना सकाळ- संध्याकाळ असे दूध दिले तर खूपच चांगले. वाढत्या वयासोबत मुलांना कधीही कॅल्शियम सप्लिमेंट्स घेण्याची गरज पडणार नाही.
6 / 6
शरीराची कॅल्शियमची गरज भरून काढण्यासाठी लहान मुलांपासून ते वयस्कर मंडळींपर्यंत सगळेच जण या पद्धतीने दूध पिऊ शकतात, असं डॉक्टर सांगतात.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सmilkदूधfoodअन्नkidsलहान मुलं