Celebrity Diets : 54 years madhuri dixits italian salad recipe combines good health
Celebrity Diets : ५४ व्या वर्षीय स्वत:ला फिट, यंग ठेवण्यासाठी धकधक गर्लचे खास डाएट; स्वत: फोटो शेअर करत म्हणाली की.... By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 11:35 AM1 / 10माधुरी दीक्षित (Madhuri dixit) ही अशा बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे जी वाढत्या वयाबरोबर अधिक सुंदर आणि तरुण दिसतेय. तिच्या अभिनयानेच नाही तर नृत्याने आणि मनमोहक हास्याने लाखो लोकांची मने जिंकली आहेत. जर तुम्ही माधुरीचे चाहते असाल तर तुम्हाला हे माहित असेलच की माधुरी देखील एक फिटनेस फ्रीक आहे आणि ती कडक फिटनेस पथ्ये पाळते. यासाठी ती तिच्या दैनंदिन दिनचर्येत सकस आणि संतुलित आहार घेण्यास प्राधान्य देते. (Madhuri dixits italian salad recipe combines good health)2 / 10तिने तिच्या #SundayFunday# चा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये प्लेटमध्ये स्वादिष्ट सॅलड दिसत आहे. फोटोत टोमॅटो, तुळशीची पाने आणि मोझारोला चीज घालून बनवलेले एक स्वादिष्ट इटालियन शैलीतील कॅप्रेस सॅलड होते. माधुरीने कॅप्शनमध्ये लिहिले - 'माझे आवडते टोमॅटो मोझरेला सॅलेड.3 / 10माधुरीनं सॅलेड अतिशय रंजक पद्धतीने सादर केले गेले. माधुरीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आयुष्यात योग्य निवड करणे नेहमीच आवश्यक असते. यावेळीही सॅलडमध्ये टोमॅटो आणि चेरीचा समावेश आहे. ते खूप ताजे आणि स्वादिष्ट देखील आहे.4 / 10माधुरीने यापूर्वी व्हॅनिला आइस्क्रीमसोबत फ्रूटी डेझर्टचा फोटोही शेअर केला होता. माधुरी दीक्षितचे इंस्टाग्रामवर 29.2 मिलियन फॅन फॉलोअर्स आहेत. ती नियमितपणे तिच्या आहार आणि फिटनेसशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करते. ज्यामुळे तिच्या फॉलोअर्सना खूप प्रेरणा मिळते. माधुरी स्वतः तिच्या फॉलोअर्सना फिट आणि हेल्दी राहण्याचा सल्ला देत असते. 5 / 10कॅप्रीज सॅलेड हे इटालियन परंपरेतील सर्वात प्रसिद्ध सलाड आहे. हे मोझझेरेला आणि टोमॅटोसारख्या विशिष्ट घटकांसह तयार केले जाते. हे सॅलड उन्हाळ्यात खायला लोकांना जास्त आवडतं. इटलीमध्ये, हे सहसा साइड डिश म्हणून नाहीतर अँटीपास्टो स्टार्टर म्हणून दिले जाते.6 / 10सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यात कॅलरीज खूप कमी असतात आणि त्यात वापरलेले सर्व घटक हेल्दी असतात. कॅप्रेस सॅलडच्या एका सर्व्हिंगमध्ये एकूण 6 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 5 ग्रॅम नेट कार्बोहायड्रेट, 8 ग्रॅम फॅट, 7 ग्रॅम प्रथिने आणि 120 कॅलरीज असतात.7 / 10कॅप्रीज सॅलड आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर आहे, टोमॅटो, तुळस आणि ताजे मोझारेला हे कॅप्रीजमधील तीन मुख्य घटक आहेत. प्रत्येक पदार्थ आरोग्यासाठी खूप चांगला मानले जाते.8 / 10टोमॅटो हे तुमच्या रोजच्या जीवनसत्वाचा उत्तम स्रोत आहे. टोमॅटोच्या एका सर्व्हिंगमुळे तुम्हाला तुमच्या रोजच्या व्हिटॅमिन सीच्या 40 टक्के प्रमाण मिळते. हे तुम्हाला पोटॅशियम, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन ए चा चांगला डोस देखील देते. टोमॅटोला लायकोपीनपासून लाल रंग मिळतो, जो निरोगी हृदय आणि डोळ्यांच्या आरोग्याशी संबंधित आहे.9 / 10तुळशीमध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि नैसर्गिक इसेंशिअल ऑईल भरपूर प्रमाणात असतात. तुळस वाळवल्यावर त्यातील काही पोषक तत्वे नष्ट होतात. पण ताजी तुळस नेहमी कॅप्रेस सॅलडमध्ये वापरली जाते. त्यातील अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि तेलांची उपस्थिती कॅन्सर, संधिवात आणि हृदयविकाराचा धोका कमी करू शकते.10 / 10मोजोरेला चीज पोटॅशियम, लोह, सोडियम आणि क्लोराईडने समृद्ध आहे. त्यात तुमच्या दैनंदिन गरजेच्या 18 टक्के कॅल्शियम फक्त एका सर्व्हिंगमध्ये असते. मोझारेलामधील फॉस्फरस तुमच्या शरीराला कॅल्शियम पुरवते. हे प्रथिनांनी भरलेले आहे आणि तुम्हाला उत्साही वाटण्यासाठी पुरेसे आहे. तुम्हालाही माधुरी दीक्षित सारखे सुंदर आणि फिट दिसायचे असेल तर आठवड्यातून एकदा या इटालियन सॅलडचा आहारात नक्की समावेश करा. आणखी वाचा Subscribe to Notifications