Celebrity Exes Who Successfully Coparent Together
घटस्फोटानंतरही ‘फक्त मुलांसाठी’ कायम प्रेमानं एकत्र येणारे सेलिब्रिटी आईबाबा, मोडलेल्या संसाराची ‘अशी’ही गोष्ट By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2024 3:04 PM1 / 10नवरा बायको घटस्फोट घेऊ शकतात (Husband - Wife). पण आईबाबांचं काय? (Parents) नताशा, हार्दिक पांड्याची पूर्व पत्नी तेच म्हणाली की मी का देश सोडून जाईन? (Parenting Tips) इथे माझ्या मुलाचं कुटूंब आहे, शाळा आहे. वडील आहेत. त्याला आम्हा दोघांची गरज आहे(Celebrity Exes Who Successfully Coparent Together).2 / 10घटस्फोटानंतर आईवडिलांनी एकमेकांशी किमान समन्वय राखत कटूता कमी केली तर ते मुलांसाठी सोपं होतं.3 / 10पाश्चिमात्य जगात या संकल्पनेला को पॅरेण्टिंग म्हणतात. म्हणजे विभक्त झाल्यानंतरही पालक म्हणून मुलांच्या विकासात, वाढीत सहभागी असणं त्यासाठी काळजी घेणं. 4 / 10आपण बरेच सेलिब्रिटी पालक पाहिले असतील जे, विभक्त झाल्यानंतरही मुलांसाठी एकत्र येतात. यालाच को - पॅरेण्टिंग म्हणतात. 5 / 10को - पॅरेण्टिंग सध्या ट्रेण्डमध्ये आहे. ऋतिक रोशन - सुझेन, हार्दिक पांड्या - नताशा आणि सोहेल खान व त्याची एक्स वाईफ सीमा सजदेह त्याआधीही आमीर खान, गौरी आणि किरण राव, फरहान आणि अधुना, अरबाज आणि मलायका अरोरा हे आपल्या मुलांसोबत दिसतात. बाहेर फिरतात. पिकनिकलाही जातात. 6 / 10सोहेल खानशी घटस्फोट घेतल्यानंतर सीमा सजदेह सांगते, आम्ही मुलांना लहानपणापासूनच काही नितीमूल्यं शिकवली आहेत. संस्कार करण्याची जबाबदारी दोन्ही पालकांची आहे. आताही मुलांसाठी योग्यवेळी आम्ही एकत्र येऊन निर्णय घेतोच. मुलांना नेहमीच पालकांची गरज असते. विभक्त झाल्यानंतरही! मुलांना हे समजले पाहिजे की त्यांचे पालक नेहमीच त्यांच्यासोबत असतात. त्यांचा आनंद हीच आमची प्रायोरिटी आहे. आमच्यासाठी दोन्ही मुलं हीच पहिली प्रायोरिटी आहे. 7 / 10आमीर खान आणि गौरी लेकीच्या लग्नात एकत्र होते. त्यावेळी त्याची दुसरी पत्नी किरण रावही हजर होती. अत्यंत आनंदाने त्यांनी एक वेगळं कुटूंब तयार केलं आहे.8 / 10ऋतिक रोशन आणि त्याची पूर्व पत्नी आणि मुलं एकत्र सेलिब्रेट करताना दिसतात. ऋतिकची नवीन मैत्रीणही सोबत असते.9 / 10फरहान अख्तर तर सांगतोच की त्याच्या मुलींसाठी आईवडिलांचा घटस्फोट त्रासदायकच होता पण त्यातून त्यांना सावरणंही पालक म्हणून गरजेचं होतं,10 / 10लग्न मोडतं, नात्यात कटूता येते. पण आईवडिल म्हणून मुलांसाठी उपलब्ध असणं आणि त्यांचं आयुष्य सोपं करणं, त्यांना साेबत करणं हे ही तितकंच महत्त्वाचं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications