शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Celebrity wore their husband clothes : विरूष्कापासून दीपवीरपर्यंत 'या' अभिनेत्री नेहमीच घालतात नवऱ्याचे कपडे; पाहा खास ड्रेसिंगचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 6:01 PM

1 / 8
मुलींना आपल्या पार्टनरचे कपडे घालायला खूप आवडतं. त्यांच्या कपाटात स्वत:चे खूप कपडे असले तरी त्यांना आपल्या पतीचे कपडे घालण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. प्रेमाचं प्रदर्शन करण्यासाठी नाही तर एक खास आनंद मिळत असल्यानं मुली आपल्या पार्टनरचे कपडे घालतात. फक्त घरातच नाही घराबाहेरही अभिनेत्री आपल्या पतीचे कपडे घालणं पसतं करतात. त्याचं जॅकेट, हूडी आणि ओव्हर साईज्ड शर्ट या लूकला अधिक प्रभावी बनवतं.
2 / 8
या यादीत केवळ सामान्य मुलीच नाहीत तर सेलिब्रिटींच्या पत्नी देखील त्यांच्या प्रेमाचे बंध दृढ करण्यासाठी हे करतात. सैफिना, दीपवीर, विरूष्का अशा अनेक टॉप सेलेब्सची नावे या यादीत सामील आहेत. तर आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही सेलिब्रिटी पत्नींबद्दल सांगत आहोत, ज्यांनी डिझायनर आउटफिट्स असूनही आपल्या पार्टनरचे आउटफिट कॅरी केले आहेत.
3 / 8
या यादीत पहिले नाव येते बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचे. अनुष्काला तिचा क्रिकेटर पती विराट कोहलीच्या कपड्यांची स्टाईल करणे आवडते आणि ती अनेक प्रसंगी विराटचे कपडे घाललेल्या लूकमध्ये दिसली आहे.
4 / 8
या यादीत पहिले नाव येते बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचे. अनुष्काला तिचा क्रिकेटर पती विराट कोहलीच्या कपड्यांची स्टाईल करणे आवडते आणि ती अनेक प्रसंगी विराटचे कपडे घाललेल्या लूकमध्ये दिसली आहे. इतकेच नाही तर एका मुलाखतीदरम्यान अनुष्काने सांगितले होते की, तिला विराटच्या वॉर्डरोबमधून कपडे चोरून ते स्टाइल करायला आवडतात. विशेषतः तिला विराटचे टी-शर्ट आणि स्वेटशर्ट्स आवडतात.
5 / 8
दीपिका आणि रणवीरमधील प्रेम सगळ्यांनाच माहीत आहे. इतकंच नाही तर रणवीरचा स्टायलिंग सेन्सही अप्रतिम आहे आणि आता रणवीर सिंगसोबत लग्न केल्यानंतर दीपिका पदुकोणची स्टाइल खूप बदलली आहे. दीपिकालाही रणवीरचे आउटफिट कॅरी करायला आवडते. हे तिला अधिक आरामदायक वाटते. विशेषत: दीपिका प्रवासात रणवीरचे पोशाष परिधान करते. एकदा दीपिका रणवीर सिंगचा निऑन ग्रीन टर्टलनेक स्वेटशर्टमध्ये दिसली होती.
6 / 8
प्रियांका आणि निक 2018 च्या हिवाळ्यात लग्नाच्या बंधनात अडकले. मात्र, त्यावेळी चाहत्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला, तर दुसरीकडे वयातील अंतरामुळे या गोंडस जोडप्याबद्दल बरेच काही बोलले जात होते. पण तरीही त्याने सगळ्यांना खोटं ठरवून आपलं प्रेम जपलं आहे. एवढेच नाही तर प्रियांका चोप्राला आंतरराष्ट्रीय तारका असूनही तिला पतीचे कपडे घालायला आवडते. एकदा ती निक जोनासच्या व्हाइट कलरच्या विंटर आउटफिटमध्ये स्पॉट झाली होती.
7 / 8
बॉलिवूडची फॅशनिस्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनम कपूरने २०१८ मध्ये आनंद आहुजासोबत लग्नगाठ बांधली. तिला महागडे डिझायनर कपडे घालण्याबरोबरच पती आनंदचे कपडे घालायलाही आवडते. ती अनेकदा तिच्या पतीचा शर्ट घालते.
8 / 8
शाहिद कपूर आणि मीरा राजपूत कपूर हे बॉलिवूडचे पॉवर कपल आहेत. मीरा राजपूत भलेही चित्रपटांमध्ये काम करत नसेल, पण तरीही ती सर्वात लोकप्रिय स्टार पत्नी आहे. इतर सेलिब्रिटी बायकांप्रमाणे मीरालाही तिचा नवरा शाहिदचे कपडे घालायला आवडतात. वास्तविक, एका कार्यक्रमासाठी त्याने शाहिदचा चेकर्ड शर्ट स्टाइल केला होता आणि त्यात शाहिदने मीराचे कौतुकही केले होते.
टॅग्स :fashionफॅशनCelebrityसेलिब्रिटीVirushkaविरूष्काDeepveerदीप- वीरSaif Ali Khanसैफ अली खान Kareena Kapoorकरिना कपूरShahid Kapoorशाहिद कपूर