शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दातांवर चिकट-पिवळा थर आला? रोज हे १ पान चावून खा; मोत्यासारखे चमकतील दात-दुर्गंधही येणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 9:32 PM

1 / 7
दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी पारंपारीक उपायांचा वापर पूर्वापार केला जात आहे. महागड्या दातांच्या ट्रिटमेंट्स घेण्याआधी तर काही घरगुती आयुर्वेदीक उपाय दातांवर केले तर दातांचं कोणतंही नुकसान होणार नाही आणि खर्च न करता चमकदार सुंदर दात मिळतील.
2 / 7
दात सुंदर दिसावेत यासाठी रोज काही पानं चावून तुम्ही खाऊ शकता. ही पानं खाल्ल्याने दातांचा पिवळा थर आपोआप निघून जाईल आणि पांढरे दात दिसतील.
3 / 7
जांभूळाची पानं रोज चावून खाल्ल्याने दातांतील प्लाक कमी होतं. ज्यामुळे दातांची स्वच्छता चांगली राहते.
4 / 7
तुळशीची पानं चावून खाल्ल्याने दातांचा रंग सुधारण्यास मदत होते. अनेक टुथपेस्टमध्ये तुळशीचा अर्क वापरला जातो. ज्यामुळे दात चांगले राहतात.
5 / 7
हिवाळ्याच्या दिवसांत दात स्वच्छ करण्यासठी तमालपत्र उत्तम आहे. तमालपत्राचा वापर करून तुम्ही दात अगदी सहज स्वच्छ करू शकता.
6 / 7
संत्र्याच्या सालीची पावडर आणि तेजपत्ता मिसळून दात घासा. ज्यामुळे दात स्वच्छ होण्यास मदत होईल.
7 / 7
पुदिन्याची पानं चावून खाल्ल्यानं दात स्वच्छ होण्यास मदत होते.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य