शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Children's day 2024 : आज ग्लॅमरस दिसणाऱ्या अभिनेत्री लहानपणी पाहा कशा दिसायच्या?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2024 4:45 PM

1 / 10
मुलं म्हणजे देवाघरची फुलं (Children's Day Special). दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा (Children's Special) केला जातो. रम्य ते बालपण म्हणत प्रत्येक जण बालपणीच्या आठवणीत नक्कीच गुंततो. पण आपण कधी आपल्या आवडत्या कलाकारांचे बालपणीचे फोटो पाहिले आहेत का? आज आपण बालदिनानिमित्त बॉलीवूड कलाकारांचे काही सोज्वळ आणि गोंडस फोटो पाहूयात(Children's Day Special 2024: A Nostalgic Look At Childhood Photos Of Bollywood Celebrities).
2 / 10
८ जुलै १९८२ रोजी जमशेदपूर येथे जन्मलेली, देसी गर्ल अर्थात प्रियांका चोप्रा, लहानपणी क्यूट तितकीच सोज्वळ दिसत असे.
3 / 10
ऐश्वर्या राय बच्चनचा जन्म १ नोव्हेंबर १९७३ रोजी कर्नाटकातील मंगलोर येथे झाला. लहानपणी ऐश्वर्या एखाद्या बाहुलीसारखी दिसायची.
4 / 10
बॉलीवूड दिवा दीपिका पदुकोणचा जन्म ५ जानेवारी १९८६ रोजी डेन्मार्कमध्ये झाला. दीपिका लहानपणी सुपरक्युट दिसायची यात काही शंका नाही.
5 / 10
बेबो अर्थात करीना कपूर खानचा क्यूट अदांवर सगळेच फिदा आहेत. तिचा जन्म २१ सप्टेंबर १९८० रोजी मुंबईत झाला. करीना लहानपणी गुटगुटीत तितकीच गोंडस दिसायची.
6 / 10
१ मे १९८८ रोजी जन्मलेली अभिनेत्री अनुष्का शर्माचा लहानपणीचा फोटो क्वचितच कुणीतरी पाहिला असेल. गुबगुबीत आणि टपोरे डोळ्यांमुळे ती खूप सुंदर दिसायची.
7 / 10
क्युटनेसच्या जोरावर बॉलीवूडमध्ये राज्य करणारी आलिया भटचा जन्म,१५ मार्च १९९३ रोजी झाला. ती लहानपणी प्रचंड क्यूट आणि टपोरे डोळ्यांमुळे ती बाहुलीप्रमाणे दिसायची. तिची मुलगीही छोटी आलिया दिसते.
8 / 10
दिवंगत श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने पदार्पणापासूनच बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घातला आहे. ७ मार्च १९९७ रोजी जन्मलेली जान्हवी कपूर आईचीच छबी दिसते.
9 / 10
५ ऑगस्ट १९७४ रोजी जन्मलेल्या काजोलने ९० च्या दशकात चित्रपटसृष्टीवर राज्य केले. पण तिचा लहानपणीचा फोटो आपण पाहिला होता का?
10 / 10
१२ ऑगस्ट १९९५ रोजी जन्मलेल्या सारा अली खानने तिच्या बडबडी आणि बेफिकीर वागण्याने सर्वांच्या हृदयात स्थान मिळवले. ती आपल्या आईसारखीच सुंदर दिसते यात काही शंका नाही.
टॅग्स :bollywoodबॉलिवूडchildren's dayबालदिनSocial Viralसोशल व्हायरल