शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१ चमचा खोबरेल तेलात मिसळा ‘या’ ५ पैकी १ पदार्थ, तुमचं तारुण्य परत आणणारी जादूई युक्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2025 15:17 IST

1 / 8
आपल्या सगळ्यांच्याच घरात खोबरेल तेल हमखास वापरलं जात. प्रामुख्याने खोबरेल तेलाचा वापर आपण केसांसाठीच करतो. परंतु खोबरेल तेलाचा वापर फक्त केसांपुरताच न करता, इतरही गोष्टींसाठीही वापरून आपल्या सौंदर्यात अधिक भर पाडू शकतो.
2 / 8
चमचाभर खोबरेल तेलात काही नैसर्गिक पदार्थ मिसळून दातांच्या स्वच्छतेपासून - त्वचेसाठी अनेक पद्धतींनी वापरु शकतो.
3 / 8
इंस्टाग्राम वरील rohitsachdeva1 या अकाउंटवरून खोबरेल तेलाच्या मदतीने, आपल्या सौंदर्यात कशी भर पाडू शकतो याचे सिक्रेट शेअर केले आहे.
4 / 8
१. चमचाभर खोबरेल तेलात १/२ टेबलस्पून हळद मिसळून या मिश्रणाने दात घासावेत. यामुळे दातांचा पिवळेपणा नैसर्गिकरित्या कमी करण्यास मदत होते.
5 / 8
२. खोबरेल तेलात कांद्याचा रस मिसळून, याने केसांना मसाज केल्यास केसगळती थांबण्यास अधिक मदत होते. याचबरोबर, केसांची जलद गतीने वाढ होण्यास फायदेशीर ठरते.
6 / 8
३. चमचाभर बेकिंग सोडा खोबरेल तेलात मिक्स करावा. हे तयार मिश्रण, काळपट झालेले कोपर, मान, गुडघ्यांवर लावून मसाज केल्याने त्वचेवरील काळपटपणा दूर होतो.
7 / 8
४. १ टेबलस्पून कॉफी खोबरेल तेलात मिसळून घ्या. हे मिश्रण डोळ्यांखालील डार्क सर्कल्सवर लावल्याने डार्क सर्कल्स कमी होतात. याचबरोबर, डोळ्यांजवळील वृधत्वाच्या खुणा देखील घालवण्यास मदत होते.
8 / 8
५. खोबरेल तेलात १ टेबलस्पून साखर मिसळून त्वचेवर लावल्याने त्वचेचे उत्तम स्क्रबिंग केले जाते. या मिश्रणाने त्वचेचे स्क्रबिंग केल्याने डेड स्किन निघून जाउन त्वचेवर ग्लो येतो.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजीHair Care Tipsकेसांची काळजीHome remedyहोम रेमेडी