शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भाजी जास्तच पातळ झाली, पाणी चुकून जास्त झालं तर? ३ ट्रिक्स, ग्रेव्ही होईल घट्ट आणि अधिक चवदार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 8:20 PM

1 / 6
स्वयंपाक करताना घाईघाईत कधी कणीक सैल होते, भातात पाणी जास्त पडतं तर कधी भाजीला रस्सा पातळ होतो. भाजीची चव बिघडू नये म्हणून काय करावं हे ऐनवेळी सुचत नाही.(Cooking Tips and Tricks) भाजीला घट्टपणा येण्यासाठी कोणी खोबऱ्याचं वाटण टाकतं तर कोणी कांदा, टोमॅटोची पेस्ट. पण प्रत्येकाला परफेक्ट ग्रेव्ही बनवता येत नाही. कारण ती बनवण्यासाठी कांदे आणि टोमॅटो, योग्य प्रमाणात पाणी किंवा मसाले घालणं फार महत्वाचे आहे. (How to reduce water in gravy)
2 / 6
ग्रेव्ही बनवताना कधी कधी रस्सा खूप पातळ होतो. (How to fix gravy that is too thin) अशावेळी तुमची मेहनत व्यर्थ गेली आणि पदार्थाची चव बिघडली असं समजू नका. आपण ग्रेव्हीमध्ये काही घटक घालून पाण्याचे प्रमाण कमी करू शकतो. (How do you make gravy tighter)
3 / 6
१) हाय फ्लेमवर स्वयंपाक केल्याने अन्न घट्ट होते. ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी आपण ही टिप फॉलो करू शकतो. फक्त थोडा वेळ आणि ग्रेव्ही शिजवायची. मोठ्या आचेवर ग्रेव्ही बनवल्यास पाण्याचे बाष्पीभवन होऊन भाजी घट्ट होऊ लागते आणि चवही छान येते.
4 / 6
३) घट्ट ग्रेव्ही बनवण्यासाठी तुम्ही दही आणि फ्रेश क्रीम वापरू शकता.
5 / 6
४) ग्रेव्हीमध्ये काजूची पेस्टही घालू शकता. यामुळे तुमची ग्रेव्ही फक्त घट्ट होणार नाही तर ती अधिक चवदारही होईल.
6 / 6
५) भाजी जास्त खारट झाली किंवा पातळ झाली तर त्यात सुकवलेल्या कांद्याची पावडरही घालता येते.
टॅग्स :Cooking Tipsकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.kitchen tipsकिचन टिप्स