शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Cooking Tips : चुकूनही 'या' धातूंच्या भांड्यात जेवण बनवू नका; शरीरात कधी विष तयार होईल कळणारही नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 4:55 PM

1 / 8
जेवण बनवण्याआधी आपण भाज्या, तांदूळ जसे स्वच्छ धुवून घेतो तसं भांडीसुद्धा स्वच्छ करणं महत्वाचं असतं. तुम्ही कोणत्या धातूंची भांडी जेवण्यासाठी, जेवण बनवण्यासाठी वापरता हे फार महत्वाचं असतं. असे अनेक धातू आहेत ज्यात जेवण तयार केल्यानंतर त्यातील पोषक तत्व कमी होत जातात आणि शरीरासाठी विषारी ठरू शकतात. तब्येत चांगली राहण्यासाठी कोणत्या पदार्थांमध्ये जेवण बनवू नये याबाबत या लेखात माहिती देणार आहोत.
2 / 8
तांब्याच्या भांड्यात पाणी पिणं किंवा खाणं सुरक्षित मानलं जातं. पण या धातुला जास्त तापमानात गरम करू नये. कारण उच्च तापमानात हा धातू प्रकिया देतो. उच्च तापमानात तांब्याच्या भांड्यासह मीठ आणि एसिड एकत्र झाल्यानं रासायनिक प्रक्रिया होते. शरीरासाठी हे विषारी ठरू शकतं.
3 / 8
एल्यूमिनियमची भांडी खूप मजबूत असतात म्हणून लोक या भांड्यात जेवण बनवतात. एल्यूमिनियम एसिड अन्नपदार्थ टोमॅटो, व्हिनेगर यांसह प्रक्रिया करतो. यामुळे अन्न पोटात गेल्यानंतर पोटदुखीची समस्या उद्भवू शकते. यामुळे शरीरात अतिरिक्त विषारी पदार्थ तयार होतात.
4 / 8
पीतळाच्या भांड्यांचा बेस खूप जड असतो. पारंपारिक पदार्थ तयार करण्यासाठी या भांड्यांचा वापर केला जातो. चिकन, मटण किंवा बिर्यानी तयार करण्यासाठी खूप वेळ लागतो म्हणून पितळाची भांडी वापरली जातात. पितळाची भांडी उच्च तापमानात मीठ आणि एसिडयुक्त अन्नपदार्थांसह रिएक्शन करतात. म्हणून पितळाच्या भांड्यात जेवण बनवू नये.
5 / 8
जेवण बनवण्यासाठी सगळ्यात चांगली भांडी लोखंडाची असतात. लोखंडाच्या भांड्यात तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवू शकता कारण याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. लोखंड आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते.
6 / 8
मातीच्या भांड्यात डाळ 25 मिनिटाच्या आत हळू आचेवर शिजते. म्हणून वरणाला नेहमी मातीच्या भांड्यात शिजवायला ठेवून तुम्ही तुमचे बाकीचे काम करू शकता. मातीच्या भांड्यातील शिजलेले वरण जर तुम्ही खाल्ले तर ते एवढे स्वादिष्ट आणि पौष्टिक असतं की तुम्ही त्याची चव विसरू शकत नाही. मातीच्या तव्यावर बनलेली पोळी आणि इतर पदार्थ तुम्हाला फक्त चांगली चव देत नाहीत तर नेहमी निरोगी ठेवतात.
7 / 8
सध्या सगळ्यांच्याच घरी जेवण बनवण्यासाठी लागणारी भांडी ही स्टिलची असतात. स्टिल चमकदार आणि वापरायला सोपे असते. स्टेनलेस स्टिल कोणत्याही प्रकारे हानीकारक ठरत नाही. पण धातूची गुणत्ता चांगली असणं गरजेचं असतं.
8 / 8
स्टिल क्रोमियम, निकेल, सिलिकॉन आणि कार्बनचे मिश्रण आहे. नेहमी चांगल्या दुकानातूनच स्टिलच्या भांड्यांची खरेदी करायला हवी.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यfoodअन्न