शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गॅस सिलेंडर पुरेल जास्त दिवस, ८ सवयी स्वत:ला लावून घ्या, पैशांची होईल चांगलीच बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2023 2:47 PM

1 / 9
LPG गॅस सिलेंडरचे वाढलेले दर हल्ली प्रत्येक घराचे महिन्याचे आर्थिक बजेट हलवून टाकत आहेत. म्हणूनच या काही सवयी स्वत:ला लावून घेतल्या किंवा आपल्या स्वयंपाक करण्याच्या पद्धतीत थोडा बदल केला तर नक्कीच महिनाभर पुरणारं LPG गॅस सिलेंडर आणखी आठ दिवस आणखी चालू शकतं. (Useful Tips to Save Cooking Gas in Home)
2 / 9
सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बऱ्याचदा ओलसर असणारी भांडी आपण गॅसवर ठेवतो. त्यातलं पाणी जाऊन ती पुर्णपणे कोरडी व्हायला थोडा अधिकचा गॅस लागतोच. त्यामुळे भांडी पुर्णपणे कोरडी करून मगच गॅसवर ठेवा.
3 / 9
कुकर लावण्यापुर्वी डाळ- तांदूळ जर अर्धा तास पाण्यात भिजत ठेवले, तर तुलनेने ते शिजायला कमी वेळ लागतो. पर्यायाने गॅसची बचत होते. शिवाय भिजवून शिजवलेले डाळ- तांदूळ आणखी पौष्टिकही असतात.
4 / 9
गॅस लायटर नेहमी चांगलंच असावं. बऱ्याचदा आपण लायटरचे बटन दाबत राहातो, पण गॅस काही चटकन लागत नाही. यामध्ये खूप गॅस विनाकारण वाया जातो.
5 / 9
अन्न शिजवताना किंवा पाणी तापवताना भांड्यावर नेहमी झाकण ठेवा. यामुळे अन्न चटकन शिजेल किंवा पाणी लवकर तापेल.
6 / 9
स्वयंपाक पटपट व्हावा, म्हणून पोळ्या करताना, भाज्या करताना अनेकजणी शेगडीची फ्लेम एकदम मोठी करून ठेवतात. यामुळे खूप गॅस वाया जााते. स्वयंपाक नेहमी मध्यम आचेवर केला तर नक्कीच सिलेंडर अधिक काळ पुरते.
7 / 9
शेगडीचे बर्नर नेहमी स्वच्छ ठेवा. त्यात काही अडकले असेल तर ते लगेच काढून टाका. यामुळेही एलपीजी गॅस जास्त दिवस चालतो.
8 / 9
अनेक जणी गॅस चालू ठेवून भाज्या चिरण्याचे काम करतात. असं करू नका. स्वयंपाकाची तयारी पुर्ण झाल्यावरच गॅस चालू करा.
9 / 9
फ्रिजमध्ये ठेवलेला कोणताही पदार्थ गरम करायचा असेल तर तो आधी फ्रिजबाहेर काढून ठेवा. त्याचं तापमान थोडं नॉर्मलला आलं की मग तो शेगडीवर गरम करायला ठेवा.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलCooking Tipsकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.Cylinderगॅस सिलेंडर