Cooking Tricks How To prevent Roti In The Casserole From Wet Try This Your Chapati Will Remail Fresh
डब्यात ठेवलेल्या चपात्या वाफेने ओल्या होतात? १ ट्रिक, चपात्या सादळणार नाहीत-राहतील मऊ By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 8:32 PM1 / 7अनेकांना चपाती बनवणं खूपच कठीण काम वाटतं. म्हणूनच एकदा बनवलेल्या चपात्या सॉफ्ट राहण्यासाठी अनेकजण कॅसरॉलचा वापर करतात. जेणेकरून एकाचवेळी जास्त चपात्या बनवतात येतील आणि त्या मऊ राहतील. 2 / 7चापातीच्या डब्ब्यात ठेवलेल्या चपात्या ओल्या होऊ नयेत यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता हे सोपे उपाय कोणते ते समजून घेऊ.3 / 7चपात्या कॅसरॉलमध्ये ठेवून पॅक करू नका. कागद किंवा कोणत्याही कापडात बांधून चपात्या ठेवा. अनेकदा चपात्यांमध्ये मॉईश्चर येते आणि चपात्या ओल्या होतात. 4 / 7जर चपात्या पॅक करण्याऐवजी प्लेटमध्ये ठेवून झाकल्या तर त्या ओल्या होणार नाहीत. असं केल्यानं चपात्या एकदम फ्रेश आणि मऊ राहतील.5 / 7इंस्टाग्राम प्रोफाईल जॅस्मीन चौधरी यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. कॅसरॉलच्या आकाराची प्लेट आत ठेवा नंतर चपात्या झाकून ठेवा. 6 / 7अनेक लोक चपात्या सरळ कॅसरॉलमध्ये ठेवतात ज्यामुळे त्यावर मॉईश्चर येते. चपाती सरळ न ठेवता बटर पेपरमध्ये पॅक करून ठेवा. ज्यामुळे मॉईश्चर येणार नाही आणि चपात्या मऊ-फ्रेश राहतील. 7 / 7चपाती शिजवण्याकडे लक्ष द्या. कारण चपात्या कच्च्या ठेवल्यास त्या ओल्या होतात. चपाती तव्यावर ठेवून व्यवस्थित शिजू द्या त्यानंतर चपाती लगेच पॅक करू नका. त्यावर थोडी हवा लागू द्या. जेणेकरून चपाती ओली होणार नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications