शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कॉटनचे कपडे धुतल्यानंतर आकसतात? करून बघा १ खास उपाय- सिल्क साड्यांसाठीही उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2024 4:43 PM

1 / 5
उन्हाळ्यात वापरायला आपण मुद्दाम स्वत:साठी, मुलांसाठी कॉटनचे कपडे आणतो. कारण कॉटनचे कपडे उन्हाळ्यात वापरायला आरामदायी, हलके- फुलके वाटतात.
2 / 5
पण बऱ्याचदा असं होतं की कॉटनचे कपडे सुरुवातीला २- ३ वेळेस जेव्हा धुतले जातात, तेव्हा प्रत्येक धुण्यानंतर ते आकसतात. कॉटनचे कपडे धुतल्यानंतर आकसू नयेत आणि जसेच्यातसे राहावेत म्हणून ते कशा पद्धतीने धुवावे, याविषयीचा एक व्हिडिओ mucherla.aruna या पेजवर शेअर करण्यात आला आहे.
3 / 5
या व्हिडिओमध्ये कपडे धुण्याची जी पद्धत सांगितली आहे, त्यानुसार आपण सिल्कच्या साड्याही घरीच धुवू शकतो आणि ड्रायक्लिनिंगचे पैसे वाचवू शकतो. हा उपाय केल्याने सिल्कच्या साड्या चमकतील तसेच त्यांना येणारा जुनाट कुबट वासदेखील निघून जाईल, असं त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.
4 / 5
व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार कॉटनचे कपडे किंवा सिल्कच्या साड्या धुण्यासाठी रिठे वापरा. १५ ते २० रिठे ५ ते ६ तास पाण्यात भिजत ठेवा. यानंतर हे पाणी उकळून थंड करून घ्या. आता या पाण्याचा फेस तयार होईल. हा झाला आपला नॅचरल शाम्पू किंवा साबण तयार.
5 / 5
आता या पाण्यात कॉटनचे कपडे किंवा सिल्कच्या साड्या भिजवा आणि हलक्या हाताने चोळून घ्या. यानंतर कपडे वाळत घाला. कॉटनचे कपडे मुळीच आकसणार नाहीत.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलCleaning tipsस्वच्छता टिप्सHome remedyहोम रेमेडी