Cotton Saree For Office Wear : Cotton Saree For Daily Use Cotton Saree Latest Designs For Women
Cotton Saree For Office Wear : साध्या कॉटनच्या साड्या देतील रुबाबदार लूक, पाहा २३ नवीन पॅटर्न, साडीतला प्रोफेशनल लूक By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 12:53 PM1 / 11साडी म्हटलं की डोळ्यांसमोर येते ते म्हणजे नट्टा-पट्टा, हेअर स्टाईल, मेकअप. पण रोजच्या वापरासाठी जेव्हा तुम्ही साडी नेसता तेव्हा ती जितकी साधी असेल तितकी सुंदर दिसते. साध्या साड्यांमध्ये कॉटनच्या साड्या पहिल्या क्रमांकावर आहेत. (Cotton Saree For Daily Use Cotton Saree Latest Designs For Women)2 / 11बऱ्याचजणी कॉटनच्या साड्या अंगावर फुगतात म्हणून नेसणं टाळतात. पण काही नवीन पॅटर्न्सच्या कॉटनच्या साड्या मार्केटमध्ये आल्या आहेत ज्या अंगावर अगदी चापून-चोपून बसतात. (Cotton Saree For Office Wear)3 / 11ऑफिसला जाताना तुम्हाला सिंपल, सुंदर लूक हवा असेल तर तुम्ही या प्रकारच्या कॉटनच्या साड्या ट्राय करू शकता. 4 / 11कॉटनच्या साडीचे फॅब्रिक मऊ असेल असंच निवडा, नैसर्गिक चमक, नेसायला हलकी अशी साडी पाहून घ्या. कडक कॉटनची साडी तुम्ही घेतली तर ती कपाटात पडून राहील.5 / 11कॉटनच्या साडीवर शॉर्ट स्लिव्हजं ब्लाऊज न शिवता तुम्ही कोपराच्या थोडं वरपर्यंत ब्लाऊज शिवा किंवा स्लिव्हजलेस ब्लाऊज शिवू शकता. या साडीवर घालण्यासाठी तुम्ही मगटापर्यंत ब्लाऊज शिवून घेतले तरी सुंदर दिसेल.6 / 11कॉमन गोल गळा न शिवता व्ही नेक, बोट नेक, कॉलर नेक, पान गळा असे पॅटर्न्स शिवू शकता.7 / 11मागच्या गळ्यात तुम्हाला नॉर्ड्स बांधण्याचा कंटाळा येत असेल तर ओपन नेकच्या सिंपल सुंदर डिजाईन्स शोभून दिसतील.8 / 11८०० रूपयांपासून ते ५००० रूपयांपर्यंत तुम्हाला या रोजच्या वापरासाठी कॉनटच्या साड्या उपलब्ध होतील.9 / 11कॉटनच्या साडीत हॅण्डलूम कॉटन, पॉवरलूम कॉटन सारी, चंदेरी कॉटन, बांधणी कॉटन, महेश्वरी, खडी, इतक, कोटा अशा विविविध प्रकारांमध्ये साड्या उपलब्ध होतील.10 / 11या साड्या धुवायला सोप्या असतात.फक्त धुतल्यानंतर लगेच इस्त्री करून सरळ कराव्या लागतील. म्हणजे तुम्ही ही साडी कधीही घालू शकता.11 / 11कॉटन साड्या तुम्हाला ऑनलाईन सहज मिळतील, त्यासाठी फार मेहनत घ्यावी लागणार नाही. फक्त साडी घेताना रिटर्न पॉलिसी चेक करून घ्या. आणखी वाचा Subscribe to Notifications