Decorated Diwali Diyas : Diwali Shopping Diwali Diyas Design Latest Dia Patterns With Price
दिवाळीत रंगेबिरंगी पणत्यांनी करा रोशनाई; पणत्यांच्या १० युनिक डिजाईन्स- घराला येईल शोभा By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 10:01 PM1 / 10दिवाळी हा दिव्यांचा सण... दिवाळीत सर्वांच्याच घरी विविध रंगांच्या पणत्यांनी रोशनाई केली जाते. आजकाल प्लेन मातीचे दिवे खूप कमी लोक वापरतात. नवीन ट्रेंडचे दिवे बाजारात मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. (Diwali Shopping Diwali Diyas)2 / 10पारंपरीक पणत्यांना नवीन लूक देण्याासाठी सुंदर असे पेंटीग केले जाते. (Latest Dia Patterns With Price)3 / 10 पणत्यांचे नवीन पॅटर्न फार महागही नसतात. पन्नास रूपयांना चार दिवे, शंभर रूपयांना चार दिवे अशा किंमतीत मिळतात. 4 / 10तर काही दिवे १०० ते १५० रूपयांना १ किंवा २ मिळतात. या दिव्यांची खासियतही तशीच असते. काही इलेक्ट्रिक दिवे असतात तर काहींवर भरपूर कोरीव काम करण्यात आलेलं असतं.5 / 10जर तुम्हाला दिव्यात सतत तेल घालण्याचा कंटाळा येत असेल आणि तर तुम्ही तेलाऐवजी इलेक्ट्रिक दिव्यांचा वापर करू शकता किंवा मेणाचे दिवेसुद्धा उत्तम पर्याय आहेत.6 / 10तुम्हाला २ किंवा ४ दिव्यांचा एकत्र स्टॅण्डसुद्धा बाजारात मिळेल.7 / 10रांगोळीच्या अवतीभोवती ठेवण्यासाठी तसंच देव्हाऱ्यात, तुळशीजवळ ठेवण्यासाठी हे दिवे मस्त पर्याय आहेत.8 / 10जर तुम्ही प्लेन मातीचे दिवे विकत घेणार असाल तर सोप्या पद्धतीनं वॉटर कलरचा वापर करून दिव्यांना रंग मारू शकता.9 / 10 १५० ते २५० पन्नास रूपयांपर्यंत तुम्हाला मोठे सुशोभित दिवे ऑनलाईन किंवा बाजारात सहज मिळतील.10 / 10तुळशीच्या आकाराचे दिवेसुद्धा खूप मस्त दिसतात. त्यात तुम्ही भरपूर तेलही घालू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications