Deficiency of Vitamin B12, Best food and fruits for vitamin B12
व्हिटॅमिन बी १२ खूपच कमी झालं आहे? ५ फळं नियमित खा, आहारतज्ज्ञ सांगतात, व्हिटॅमिन बी १२ कमी असेल तर.. By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2023 5:07 PM1 / 8व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता (Deficiency of Vitamin B12) अनेक जणांमध्ये दिसून येते. यामुळे मग अशक्तपणा येणे, सतत थकवा जाणवणे, कधीच उत्साही नसणे अशा समस्या तर जाणवतातच. पण आरोग्याच्या इतर अनेक तक्रारीही डाेके वर काढतात. व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असेल, तर त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावरही जाणवू लागतो.2 / 8त्यामुळे तुम्हालाही आरोग्याच्या अशा तक्रारी जाणवत असतील किंवा शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असेल तर त्यासाठी कोणती फळे प्रामुख्याने खायला पाहिजेत, याविषयी आहारतज्ज्ञ शिखा अग्रवाल शर्मा यांनी नवभारतटाइम्स.कॉम यांना ही माहिती दिली आहे. व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेतलाच पाहिजे. पण त्यासोबतच आहारात ही काही फळे (food and fruits for vitamin B12) सामाविष्ट करायला हरकत नाही. 3 / 8 पेरू या फळातूनही काही प्रमाणात व्हिटॅमिन बी १२ मिळते. त्यासाेबतच त्यातून व्हिटॅमिन सी, ए, के, फॉलिक ॲसिड, फायबर हे देखील भरपूर प्रमाणात मिळते.4 / 8आंबेही शरीराला व्हिटमिन बी १२ चा पुरवठा करतात. तसेच व्हिटॅमिन सी, ए, पोटॅशियम यांचा उत्तम स्त्रोत म्हणून या फळांच्या राजाकडे पाहिले जाते.5 / 8आरोग्यासाठी पोषक असणारे सफरचंदही शरीराला काही प्रमाणात व्हिटॅमिन बी १२ चा पुरवठा करते.6 / 8नारळपाणी प्यायल्याने किंवा नारळ खाल्ल्यानेही शरीराला व्हिटॅमिन बी १२ मिळते. याशिवाय नारळातून मोठ्या प्रमाणावर मॅग्नेशियम, कॅल्शियम, फायबर मिळते.7 / 8आंबटगोड चवीची संत्री व्हिटॅमिन बी १२ चा उत्तम स्त्रोत मानली जाते. 8 / 8स्वस्तात मस्त फळ म्हणजे केळी. केळीतून जसे मॅग्नेशियम, पोटॅशियम भरपूर प्रमाणात मिळते, तसेच त्यातून व्हिटॅमिन बी १२ आणि व्हिटॅमिन बी ६ चा लाभही होतो. आणखी वाचा Subscribe to Notifications