शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Diabetes Tips : अरे व्वा! फक्त ७ दिवसात वाढलेली शुगर लेव्हल कमी करतो 'हा' पदार्थ; संशोधनातून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 4:55 PM

1 / 8
गेल्या काही वर्षांपासून डायबिटीसच्या रुग्णांमध्ये मोठ्या संख्येनं वाढ होत आहे. खासकरून आता कोरोना व्हायरसच्या संक्रमणानंतर तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या दोन राज्यात डायबिटीसच्या रुग्णांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. वयस्कर लोकच नाही तर तरूण, लहान मुलसुद्धा या जीवनशैलीशी निगडीत आजाराला बळी पडत आहेत. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यानंतर रुग्णाला गंभीर समस्येचा सामना करावा लागतो. खाण्यापिण्याकडेही व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं असतं.
2 / 8
महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशच्या डॉक्टरांनी एक खास फळ रुग्णाची साखरेची पातळी कमी करण्यासाठी फायदेशीर असल्याचं सांगितलं आहे. अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार डायबिटीसच्या रुग्णांसाठी फणसाचे सेवन फायदेशीर ठरते. कच्च असल्यास भाजी करून आणि पिकलेलं असल्यास फळाप्रमाणे फणस खाल्लं जातं.
3 / 8
आंतरराष्ट्रीय जर्नल 'नेचर' मध्ये प्रकाशित केलेल्या माहितीनुसार फणस प्रभावीपणे डायबिटीस नियंत्रणात ठेवतो. पुण्यातील चेलाराम डायबिटीस इंस्टिट्यूटचे सीईओ एजी उन्नीकृष्णन आणि श्रीकाकुलम सरकारी वैद्यकिय महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. गोपाल राव यांनी हे संशोधन केले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार फणसाच्या सेवनानं रुग्णांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येतो.
4 / 8
या अभ्यासात दिसून आलं की, फणसाचं पीठ सात दिवसात रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. डॉक्टर राव यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, ''अमेरिकन डायबिटीज एसोसिएशनद्वारे करण्यात आलेल्या या अभ्यासाचे निकाल डायबिटिस नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्वपूर्ण ठरू शकतात. खासकरून भारतासारख्या ठिकाणी जिथं खाण्यापिण्याचे खूप पर्याय उपलब्ध आहेत.''
5 / 8
या संशोधनासाठी टाईप २ डायबिटीस असलेल्या ४० रुग्णांना आहारात भात, गव्हाच्या जागेवर फणसाच्या पीठाचा वापर करण्यास सांगितले. तीन महिने ३० ग्राम फणसाच्या पीठाचा समावेश आहारात करण्यास सांगितले. तीन महिन्यांनंतर फास्टिंग ब्लड शुगर, पोस्टप्रांडियल ब्लड ग्लूकोज आणि HbA1c च्या पातळीत कमतरता दिसून आली. याशिवाय रुग्णांचे वजनही कमी झालं होतं.
6 / 8
दरम्यान पाश्चात देशांच्या तुलनेत भारतात डायबिटीसचा वेगळा पॅटर्न पाहायला मिळतो. ३० टक्क्यांपेक्षा जास्त डायबिटीसचे रुग्ण लठ्ठपणाच्या समस्येत येत नाहीत.
7 / 8
अभ्यासानुसार फणसाचं पीठ साखरेची पातळी कमी करण्यासोबतच ग्लायसेमिक इंडेक्स नियंत्रणात ठेवण्यातही फायदेशीर ठरतं.
8 / 8
फणसाचं पीठ तयार करण्यासाठी सगळ्यात आधी बीया व्यवस्थित सुकवून घ्या. बीयांना व्यवस्थित सुकवून वरची सालं काढून घ्या. त्यानंतर बीया व्यवस्थित कापून बारीक दळून घ्या. दर दिवशी ३० ग्राम फणसाचे पीठ इतर पीठांमध्ये मिसळून त्याचे चपाती किंवा भाकरीच्या रुपात सेवन करा.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यdiabetesमधुमेहResearchसंशोधनfoodअन्नExpert Opinionतज्ज्ञांचा सल्ला