शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दिवाळीसाठी किचनची साफसफाई कुठून सुरू करावी सुचत नाही? ५ टिप्स- स्वयंपाकघर चमकवा न दमता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2024 3:06 PM

1 / 6
दिवाळी आता तोंडावर आल्याने घरोघरी स्वच्छतेच्या कामाला वेग आला आहे (Diwali 2024). प्रत्येकाच्याच घरात स्वयंपाक घर हे असं एक ठिकाण असतं जिथे खूप पसारा असतो. अगदी छोट्या छोट्या कप्प्यांमध्ये पण खच्चून सामान भरलेलं असतं. त्यामुळे स्वयंपाक घर तर आवरायचं आहे, पण त्याची स्वच्छता नेमकी कुठून सुरू करावी, कशी करावी, हे अनेकींना सुचत नाही. त्यासाठीच बघा या काही खास टिप्स..
2 / 6
सगळ्यात आधी तर किचनला माळे असतील तर ते रिकामे करा. तिथे आपण बऱ्याच अशा वस्तू ठेवलेल्या असतात ज्या आपल्याला आजपर्यंंत कधी उपयोगी आलेल्या नसतात. पण कधीतरी त्या उपयोगी येतील म्हणून आपण साठवून ठेवलेल्या असतात. त्या वस्तू आधी खाली काढा आणि ज्याला त्याची खरच गरज असेल त्याला त्या देऊन टाका. असं केल्याने घरातला बराच पसारा कमी होईल आणि गरजेच्या वस्तू ठेवायला तुम्हाला जागा मिळेल.
3 / 6
माळ्यांची आवराआवरी केल्यानंतर किचन ट्रॉली काढा. त्यातले भांडे आणि ट्रॉलीच्या आतल्या भागाची स्वच्छता करा.
4 / 6
यानंतर क्रॉकरी किंवा इतर सामान ठेवायला स्वयंपाक घरात जे कप्पे असतात, ते आवरायला घ्या. या कप्प्यांमधूनही खूप पसारा बाहेर निघतो आणि आपण किती अनावश्यक वस्तू जमवून ठेवल्या आहेत, हे लक्षात येते.
5 / 6
त्यानंतर तुम्ही फ्रिज स्वच्छ करण्याची मोहिम हातात घ्या. फ्रिजमध्ये पण आपण कित्येक अनावश्यक वस्तू कोंबलेल्या असतात. अशा सगळ्या वस्तू कोणत्याही गरजवंत व्यक्तीला द्या. तुमच्या घरात त्या साठवून ठेवण्यापेक्षा कोणाला तरी त्या लगेचच वापरायला मिळत असतील तर अधिक चांगले..
6 / 6
सगळ्यात शेवटी ओटा, स्वयंपाक घरातले लाईट, सिंक असं आवरायला घ्या. या ५ टप्प्यांमध्ये स्वयंपाक घर आवरल्यास तुमचं काम खूप साेपं आणि विशेष म्हणजे पटापट होईल.
टॅग्स :Cleaning tipsस्वच्छता टिप्सkitchen tipsकिचन टिप्सDiwaliदिवाळी 2024