शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Diwali : दिवाळीत सोन्याचे कानातले घ्यायचेत? पाहा १ ग्रॅम सोन्याच्या कानातल्यांचे १० नवे सुंदर डिझाइन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 2:23 PM

1 / 11
दिवाळी (Diwali 2024) म्हटलं की शॉपिंग आलीच. दिवाळीच्या दिवसांत ज्वेलरीचे नवनवीन कलेक्शन्स येतात. खासकरून सोन्याच्या दुकानात मंगळसुत्र, कानातले, गळ्यातले हार यांचे वेगवेगळे ऑपश्नस पाहायला मिळतात. (Diwali Jewellery Special Daily Use Earrings)
2 / 11
रोज वापरता येतील असे नाजूक कानातले तुम्ही या दिवाळीत खरेदी करू शकता. सुंदर,नाजूक कानातल्यांच्या डिजाईन्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील. हे कानातले तुम्ही ड्रेस,साडी, कुर्ता कशावरही घालू शकता.
3 / 11
टॉप्स, झुमके, लटकन असणारे कानातले नेहमीच ट्रेंडींग असतात. प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते तुम्ही आपल्या आवडीनुसार कानातल्यांची निवड करू शकता.
4 / 11
आर्टिफिशल कानातले वापरल्यानं अनेकांच्या कानांवर डाग पडतात तर कधी कान दुखू लागतात. रोज वापरण्यासाठी आर्टिफिशियल कानातले घेण्यापेक्षा तुम्ही सोन्याचे कानातले घेऊ शकता.
5 / 11
2 ते 3 ग्रॅममध्ये तुम्हाला हे कानातले सहज मिळतील. या कानातल्यांचा वापर तुम्ही कोणत्याही खास प्रसंगी करू शकता.
6 / 11
कानातल्यांवर पान किंवा फुलांची डिजाईन्ससुद्धा उठून दिसते.
7 / 11
सोन्याच्या कानातल्यांमध्ये बारीक बारीक स्टोन्स लावलेले असल्यास कानातले अधिक उठून दिसतात. सध्या ज्वेलरीमध्ये अमेरिकन डायमंडचा क्रेझ खूप आहे.
8 / 11
जर तुम्हाला लटकणारे कानातले आवडत नसतील तर या टाईपचे छोटे कानातले विकत घेऊ शकता.
9 / 11
रिंग्स पॅटर्नचे कानातले इव्हरग्रीन आहेत. रिंगामध्ये तुम्ही पानांची डिजाईन निवडू शकता.
10 / 11
जर तुम्हाला हेवी लूक नको असेल पण झुमके घालायला आवडत असती तर तुम्ही झुमक्यांचे नाजूक छोटे डिजाईन घेऊ शकता.
11 / 11
या टाईपचे कानातले ऑफिस वेअर, साडी नेसल्यावर किंवा एखाद्या समारंभासाठीही उठून दिसतील.
टॅग्स :ShoppingखरेदीfashionफॅशनDiwaliदिवाळी 2024jewelleryदागिने